नवी दिल्ली - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात दारुची दुकाने उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. लॉकडाऊन-3 मध्ये सरकारने दारुची दुकाने उघडण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. यामध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यास सांगितले आहे. मात्र अनेक ठिकाणी दारू पायी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. दुकाने उघडणार म्हणून तळीरामांना मोठा दिलासा मिळाला होता. यातच आता मद्यप्रेमींसाठी एक खूशखबर आहे.
दारुची दुकाने उघडल्यावर मद्यप्रेमींनी अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लावत होत्या. दिल्लीमध्ये आता दारू स्वस्त होणार आहे कारण केजरीवाल सरकारने दारूवर लावण्यात आलेलं कोरोना शुल्क हटवण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी दिल्ली सरकारनेही मद्यावर अतिरिक्त 70 टक्के कोरोना महारोगराई कर लादण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता 10 जूनपासून हे शुल्क रद्द करण्यात येणार आहे. मद्याचे दरही कमी होणार आहेत.
दिल्लीतील सरकारच्या या निर्णयामुळे मद्यप्रेमींना आता दारू खरेदी करताना जास्तीचे पैसे मोजावे लागणार नाहीत. छापील किरकोळ विक्री किंमतीत मद्य मिळू शकणार आहे. दिल्ली सरकारने दारू विक्रीवर 70 टक्के कोरोना महारोगराई कर लादण्याचा निर्णय घेतला होता. त्याला 'स्पेशल कोरोना फी' असे नाव देण्यात आले होते. सरकारच्या या निर्णयामुळे कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी राबविण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्येच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या महसुलाला चालना मिळाली. त्यानंतर आता कोरोना शुल्क हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Today's Fuel Price : 80 दिवसांत पहिल्यांदा झाली पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ; जाणून घ्या नवे दर
'बजाज कोविड किंवा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ नाहीत'; देवेंद्र फडणवीसांचा निशाणा
30 जून आधी पूर्ण करा 'ही' 7 महत्त्वाची कामं, नाहीतर होईल मोठं नुकसान
CoronaVirus News : ...म्हणून कोरोना पॉझिटिव्ह महिलेने बाळाचं नाव ठेवलं 'सॅनिटायझर'
CoronaVirus News : शिक्षणासाठी काय पण! 'या' मुलीच्या जिद्दीला तुम्हीही कराल सलाम
CoronaVirus News : मंदिरात सॅनिटायझरच्या वापराला पुजाऱ्यांचा विरोध; 'हे' आहे कारण