प्रोजेक्टर वितरणाबाबत शाळांची यादी रद्द
By admin | Published: April 05, 2016 12:15 AM
जळगाव- जिल्हाभरातील ४४ शाळांना डिजीटल शिक्षणासंबंधी प्रोजेक्टर वितरण करण्यात येणार होते. तशी यादी संबंधित गटशिक्षणाधिकार्यांनी तयार करून ती वरिष्ठ कार्यालयास पाठविली होती. परंतु ही यादी जि.प.सदस्यांच्या आक्षेपानुसार रद्द करण्यात आली आहे. आता सदस्यांना विश्वासात घेऊन नव्याने यादी तयार केली जाईल.
जळगाव- जिल्हाभरातील ४४ शाळांना डिजीटल शिक्षणासंबंधी प्रोजेक्टर वितरण करण्यात येणार होते. तशी यादी संबंधित गटशिक्षणाधिकार्यांनी तयार करून ती वरिष्ठ कार्यालयास पाठविली होती. परंतु ही यादी जि.प.सदस्यांच्या आक्षेपानुसार रद्द करण्यात आली आहे. आता सदस्यांना विश्वासात घेऊन नव्याने यादी तयार केली जाईल. मुंबई येथील वेदांता फाउंडेशनने जिल्हाभरातील ४४ शाळांना प्रोजेक्टर देण्याचे म्हटले होते. त्यासंबंधी राज्याच्या शिक्षण परिषदेशी चर्चा झाली होती. परंतु सामंजस्य करारावर स्वाक्षर्या न झाल्याने दोन वर्षे प्रोजेक्टर वितरण होत नव्हते. हा करार नुकताच झाला. त्यानुसार ४४ शाळांना प्रोजेक्टर वितरण करण्यासाठी संबंधित तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी यांनी यादी तयार केली व ती वरिष्ठ कार्यालयास पाठविली. परंतु संबंधित शाळा निवडताना आपल्याला विचारणा झाली नाही, अशी नाराजी काही सदस्यांनी व्यक्त केली. त्याची दखल घेऊन ही यादी रद्द करण्यात आली. आता नव्याने यादी तयार करून प्रोजेक्टरचे वितरण संबंधित शाळांना केले जाणार आहे.