नवी दिल्ली : पुढील वर्षी होणा-या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाने जंगी पूर्वतयारी सुरु केली असून त्यावर पक्षाध्यक्ष अमित शहा बारीक लक्ष ठेवून आहेत. प्रत्येक मतदारसंघातील स्मार्टफोन वापरणाºया मतदारांची यादी तयार करणे, प्रत्येक मतदान केंद्रासाठी मोटारबाईक असलेले भाजपचे पाच कार्यकर्ते सज्ज ठेवणे, प्रतिस्पर्धी पक्षांच्या कार्यकर्त्यांना आपल्या बाजूला वळविणे अशी कामे पक्षकार्यकर्त्यांना सोपविण्यात येणार आहेत.लोकसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी २२ गोष्टींचा समावेश असलेला एक कृती आराखडा पक्षाने तयार केला आहे. त्या प्रक्रियेशी खूप जवळचा संबंध असलेल्या दोन भाजप नेत्यांनी आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर ही माहिती दिली.वैयक्तिक संपर्कावरही भरप्रत्येक लोकसभा मतदारसंघातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्याबरोबरच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून वैैयक्तिक संपर्कावरही भर देण्यात येईल. तशा सूचनाही नेते व कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी अमित शहा यांनी १० जूनपासून प्रत्येक राज्याचा दौरा करायला सुरुवात केली होती. जुलै अखेरीपर्यंत ते सर्व राज्यांना भेट देतील. पूर्वतयारीसाठी तयार केलेला भाजपने तयार केलेला आराखडा प्रत्येक राज्यातील भाजप प्रदेशाध्यक्षांकडे पाठविण्यात आला आहे. त्यानूसार काम करण्याचे आदेशही पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत.प्रत्येक बुथमध्ये महिन्याला पक्षाचे सहा कार्यक्रमप्र्रत्येक बुथमध्ये जे मतदार स्मार्टफोन वापरतात त्यांची यादी करण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या फोनधारकांपर्यंत पोहोचून पक्षाचा प्रचार केला जाईल. त्याचप्रमाणे प्रत्येक बुथमध्ये मोटरसायकल असलेले पाच पक्षकार्यकर्ते सज्ज ठेवण्यात येतील.चार गटांत विभागणीनिवडणुक पूर्वतयारीसाठी तयार केलेल्या आराखड्यात देशभरातील बुथचे अ, ब, क, ड अशा चार वर्गात विभाजन करण्यात आले आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक पसंती देणारे मतदार जिथे आहेत तो अ वर्गाचा बुथ,जिथे भाजपला पराभव पत्करावा लागला तो ड वर्गाचा बुथ असा निकष त्यासाठी लावला आहे. ड वर्गातील बुथची जबाबदारी भाजपच्या तळागाळातील कार्यकर्त्याला व सी वर्गाच्या बुथची जबाबदारी पक्ष पदाधिकाºयावर सोपविण्यात येईल.
स्मार्ट फोन वापरणाऱ्यांची भाजपने तयार केली यादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 11:55 PM