साहित्य संमेलन समारोप
By admin | Published: September 06, 2015 11:54 PM
सावरकर यांच्यावरील हत्येचा ठपका पुसला जावा
सावरकर यांच्यावरील हत्येचा ठपका पुसला जावाशेषराव मोरे : चौथ्या विश्व साहित्य संमेलनाचा समारोपपार्ट ब्लेअर : महात्मा गांधी यांच्या हत्येच्या आरोपातून न्यायालयाने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांची निदरेष मुक्तता केली आहे. मात्र त्यानंतरही कपूर कमिशनच्या अहवालावरून सावरकरांवर ठपका ठेवण्यात आला. सावरकरांची बदनामी थांबवायची असेल तर सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून अहवालातील परिच्छेद काढून टाकावा, अशी मागणी चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. शेषराव मोरे यांनी केली.विश्व मराठी साहित्य संमेलनाचा रविवारी समारोप झाला. त्या वेळी ते बोलत होते. मोरे म्हणाले, सावरकरांच्या मृत्यूनंतर कपूर कमिशनने दिलेल्या अहवालानुसार सावरकर यांच्याविरोधात सातत्याने लेखन केले जात आहे. न्यायालयाने सावरकर यांना निदरेष ठरविले आहे. तरीही त्यांना कुणी दोष देत असेल तर थेट सावरकरप्रेमींनी पोलिसांत तक्रार दिली पाहिजे. कारण कपूर कमिशनच्या दोन खंडाच्या अहवालात असे कुठेही म्हटलेले नाही, की सावरकरांमुळे गांधी यांची हत्या झाली. केंद्रात तसेच राज्यात किमान सावरकरद्वेषी सरकार नाही, त्यामुळे या सरकारांनी पुढाकार घेऊन अहवालातील संबंधित परिच्छेद काढून टाकावा.सावरकर यांच्या विचाराने माझी वाटचाल सुरू झाली. कोणत्याही टीकेची पर्वा न करता मी सावरकर मांडत आलो आहे. पुढच्या पिढीकडे हा वारसा पोहोचवत आहे. सावरकरांना सर्मपित साहित्य संमेलन म्हणजे महाराष्ट्रात वैचारिक परिवर्तनाची नांदी आहे. सावरकर यांचा बुद्धिवाद घ्या, त्यांची हिंदूहिताची दृष्टी घ्या, सावरकर यांना सोडून देशाला एकही पाऊल टाकता येणार नाही, असे त्यांनी नमूद केले.संमेलनाच्या अखेरच्या दिवशी सावरकर यांच्यावर आधारित कार्यक्रम झाले. ‘समाजसुधारणा आणि विज्ञाननिष्ठा’ हा परिसंवाद रंगला. विज्ञाननिष्ठ सावरकर म्हणजे काय, या वेळी सांगण्यात आले. ‘मी सावरकर बोलतोय’ हा विशेष एकपात्री कार्यक्रम झाला. अभिनेते योगेश सोमण यांनी याचे सादरीकरण केले. मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक संस्थेने आयोजित केलेला ‘शतजन्म शोधताना’ या कार्यक्रमाद्वारे महाकवी सावरकर यांचे अनोखे दर्शन झाले.संमेलनाच्या समारोप समारंभाला घुमान साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे, स्वागताध्यक्ष खासदार राहुल शेवाळे, अंदमानच्या कला आणि संस्कृती विभागाचे प्रमुख आर. देविदास, अंदमानचे खासदार विष्णूदास रे यांच्या पत्नी रूपा, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, सुनील महाजन, पोर्ट ब्लेअर महाराष्ट्र मंडळाचे अरविंद पाटील उपस्थित होते.