नवी दिल्ली- भाजपाचे नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर 11 जून 2018 पासून एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. किडनीच्या आजारानं त्रस्त असलेल्या 93 वर्षांच्या वाजपेयींची प्रकृती नाजूक आहे. गेल्या 24 तासांमध्ये त्यांची प्रकृती अधिकच खाल्यावल्याचे एम्सकडून सांगण्यात आले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, सुरेश प्रभू, स्मृती इराणी यांच्यासह इतर नेत्यांनीही एम्समध्ये जाऊन वाजपेयी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 50 मिनिटे एम्स रुग्णालयात होते. पंतप्रधानांनंतर केंद्रीय मंत्र्यांनीही रुग्णालयात जाऊन वाजपेयींच्या प्रकृतीची माहिती घेतली आहे. अनेक नेत्यांनी ट्विट करून वाजपेयींना दीर्घायुष्य लाभावं, अशी प्रार्थना केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सहा मंत्र्यांनी केली विचारपूसपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना पाहण्यासाठी एम्समध्ये जाऊन आले. त्यानंतर केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे, सुरेश प्रभू, हर्षवर्धन, जितेंद्र सिंह, शाहनवाज हुसैन हेसुद्धा वाजपेयींना पाहण्यासाठी एम्समध्ये गेले होते. पंतप्रधानांपूर्वी स्मृती इराणींनी वाजपेयींच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी एम्समध्ये पोहोचल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज अटल बिहारी वाजपेयींच्या प्रकृतीची माहिती घेत असतात.अटल बिहारी वाजपेयी LIVE UPDATES
काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा एम्समधून बाहेर पडले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् भाजपाध्यक्ष अमित शहा एम्समध्ये पोहोचले
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींची प्रकृती खालावलेलीच, सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे- AIIMSपरराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि कृषिमंत्री राधामोहन सिंह एम्स रुग्णालयात पोहोचलेतृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी याही दिल्लीकडे रवाना झाल्या आहेत. अटलबिहारी वाजपेयींच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी त्या एम्स रुग्णालयात दाखल होतील.काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही एम्स रुग्णालयात जाऊन अटलबिहारी वाजपेयींच्या प्रकृतीची विचारणा केली.ग्वाल्हेर येथे वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून अटलबिहारी वाजपेयींच्या प्रकृती सुधारणेसाठी यज्ञभाजपाध्यक्ष अमित शाहांनी एम्स रुग्णालयात जाऊन अटल बिहारी वाजपेयींच्या तब्येतीची केली विचारपूस- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एम्स रुग्णालयात पोहोचले