हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल 2017 LIVE UPDATES हिमाचलमध्ये कमळ फुलणार, काँग्रेसचा दारुण पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 09:18 AM2017-12-18T09:18:07+5:302017-12-18T15:05:07+5:30
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक निकालाची मतमोजणीला सुरु आहे. अपेक्षेप्रमाणे हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाने बहुमताचा आकडा गाठला आहे.
सिमला - गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक निकालाची मतमोजणीला सुरु आहे. अपेक्षेप्रमाणे हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाने बहुमताचा आकडा गाठला आहे. 68 जागा असलेल्या हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाने 41 आणि काँग्रेस 23 जागांवर आघाडीवर आहे. हिमाचल प्रदेशमध्ये बहुमतासाठी 35 जागांची आवश्यकता आहे.
मागच्या आठवडयात बहुतांश एक्झिट पोल चाचण्यांमधून हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाचे सरकार येईल असा अंदाज वर्तवला होता. हिमाचल प्रदेशमध्ये नेहमीच सत्तांतराचा इतिहास राहिला आहे. दर पाच वर्षांनी इथे आलटून-पालटून भाजपा आणि काँग्रेसचे सरकार येत असते. सध्या हिमाचलमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. 68 जागांसाठी हिमाचल प्रदेशात 75 टक्के मतदान झाले होते. गुजरातच्या 33 जिल्ह्यांतील 37 केंद्रांवर मतमोजणी होत आहे. तर, हिमाचल प्रदेशमध्ये 42 केंद्रांवर मतमोजणी होत असून, सर्वत्र कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
EVMs opened at a counting centre in Shimla's Kasumpati as counting of votes continues #HimachalPradeshElectionspic.twitter.com/rsid3L2xgd
— ANI (@ANI) December 18, 2017
गुजरातमध्ये काँग्रेस आणि भाजपा दोन्ही पक्षात अटीतटीचा सामना सुरु आहे. आतापर्यंत 169 मतदारसंघांचा कल हाती आला असून, त्यामध्ये काँग्रेसने भाजपावर आघाडी घेतली आहे. भाजपा 81 तर काँग्रेस 85 जागांवर आघाडीवर आहे. गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य असल्याने त्यांच्यासाठी गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची तर काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची ही कसोटी समजली जात आहे. दरम्यान, दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल असा अंदाज आहे.
EC Official Trends for #HimachalPradeshElections: BJP now leading on 20 seats, Congress on 9, Others 2
— ANI (@ANI) December 18, 2017
गुजरातच्या 33 जिल्ह्यांतील 37 केंद्रांवर मतमोजणी होत आहे. तर, हिमाचल प्रदेशमध्ये 42 केंद्रांवर मतमोजणी होत असून, सर्वत्र कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मतदानापूर्वी आलेल्या सर्वच एक्झिट पोलमध्ये दोन्ही राज्यांमध्ये भाजपाची सत्ता बनेल असा दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि गुजरात निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारं त्रिकूट म्हणजे हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांनी भाजपाच्या पराभवाचा दावा केला आहे.
केवळ इव्हीएममध्ये घोळ करूनच भाजपा गुजरातमध्ये विजय मिळवू शकेल आणि 18 डिसेंबरच्या आधी म्हणजेच शनिवारी आणि रविवारी रात्री भाजपा ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा करेल असा आरोप हार्दिक पटेलने केला होता. ईव्हीएमध्ये गडबड झाली नाही तर भाजपाला 82 जागा मिळतील, असं हार्दिक पटेलने म्हटलं होतं.