नवी दिल्ली : ट्रेनची माहिती मिळविण्यासाठी आता 139 किंवा अन्य कोणत्याही अॅपवर जाण्याची यापुढे गरजच उरलेली नाही. कारण आता ट्रेनचा लाईव्ह स्टेटस, पीएनआरची माहिती आपल्या जिवाभावाच्या व्हॉट्सअॅपवर सहज मिळणार आहे. यासाठी रेल्वेने MakeMyTrip या वेबसाईटसोबत सामंजस्य करार केला आहे. चला तर मग जाणून घेऊया व्हॉट्सअॅपवर कसा ट्रेनचा स्टेटस पहायचा...
स्टेप 1 : आधी आपल्याला व्हॉट्सअॅप अपडेट करावे लागेल. गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपलच्या अॅप स्टोअरवर अपडेट मिळेल.
स्टेप 2 : एखाद्या नंबर जोपर्यंत सेव्ह केला जात नाही तोपर्यंत त्या नंबरवर आपण चॅट सुरु करू शकत नाहीत. यासाठी आपल्या फोनमध्ये MakeMyTrip चा फोन नंबर 7349389104 सेव्ह करावा लागेल.
स्टेप 3 : हा नंबर सेव्ह केल्यानंतर व्हाट्सअॅप सुरु करा. त्यानंतर MakeMyTrip च्या चॅट विंडोवर जावे. लक्षात असू द्या की पहिल्यांदा वापरत असताना MakeMyTripचा नंबर दिसत नसेल तर काही वेळ वाट पहावी. किंवा कॉन्टॅक्ट लिस्ट रिफ्रेश करावी.
स्टेप 4 : MakeMyTrip च्या चॅट विंडोवर आपल्याला हव्या असलेल्या ट्रेनचा नंबर पाठवावा. उदाहरणार्थ, मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेसचा स्टेटस हवा असेल तर या गाडीचा 11007 हा नंबर पाठवावा. यानंतर आपल्याला लाईव्ह ट्रेनचा स्टेटस आणि वेळापत्रक येते.
स्टेप 5 : याशिवाय पीएनआर नंबर पाठवून बुकिंग स्टेटस पाहिला जाऊ शकतो.
महत्वाचे म्हणजे सर्व्हर व्यस्त नसेल तर केवळ 10 सेकंदांत ही माहिती मिळणार आहे. यासाठी पाठवलेल्या मेसेजला ब्लू टीक होणे गरजेचे आहे.