नवी दिल्ली: गेल्या आठवड्यात उत्तर भारतात आलेल्या वादळानं शंभरहून अधिक जणांचा बळी घेतला होता. आता पुन्हा या वादळाचा फटका देशातील 15 राज्यांना बसण्याची शक्यता आहे. सध्या हे वादळ दिल्लीत धडकलंय. हरयाणात पोहोचलेल्या वादळाचा वेग ताशी 70 किलोमीटर इतका आहे. हवामान खात्यानं आधीच या वादळाचा अंदाज व्यक्त केला होता. यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयानं 15 राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या अनेक राज्यांमधील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय हरयाणामधील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागानं घेतलाय. उत्तर भारतात गेल्या आठवड्यातही वादळानं हाहाकार माजवला होता. यामध्ये शंभरहून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा एकदा दिल्लीसह उत्तर भारतातील राज्यांना वादळाचा धोका आहे. राजस्थानच्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सुरूय. तर गाझियाबादमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. नोएडामधील सर्व शाळादेखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. हवाई वाहतुकीवर वादळाचा परिणाम झालाय. हवाई वाहतूक जवळपास 22 मिनिटं उशिरानं सुरुय. दिल्ली विमानतळ परिसरात वाऱ्याचा वेग 60 किलोमीटर प्रतितास इतका असल्यानं विमान सेवेवर परिणाम झालाय.Live Updates:
- उत्तराखंडमधील देहरादून येथे पाऊस आणि धुळीच्या वादळामुळे वीजेचे खांब कोसळले; वीज पुरवठा खंडित- उत्तरराखंडमधील सर्व अधिकारी पुढील 48 तास हाय अलर्टवर. वारा 70 ते 80 किलोमीटर प्रतितास वेगानं वाहण्याची शक्यता
- ग्रेटर नोएडा-दादरी भागातील वीज पुरवठा खंडित; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्यास सुरुवात- धुळीच्या वादळाचा वाहतुकीवर परिणाम; यमुना एक्स्प्रेस वेवरील वाहतूक संथ गतीनं
- दिल्ली-एनसीआरमध्ये वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किलोमीटर- गुरुग्राममध्ये वादळ धडकलं; सायबर सिटीमधील वीज पुरवठा खंडित