रस्त्यावरून चालताना, रस्त्यावरून वाहन चालवत असताना सतर्क राहणं गरजेचं असतं. वाहन चालवताना सावध न राहल्यास अपघाताचा धोका असतो. दरवर्षी रस्ते अपघातात हजारो जणांचा जीव जातो. जागतिक बँकेच्या अहवालानुसार गेल्या वर्षी जगभरात रस्ते अपघातात झालेल्या मृत्यूंपैकी ११ टक्के मृत्यू भारतात झाले होते. त्यामुळे वाहन चालवताना सावध आणि सतर्क राहणं आवश्यक आहे. अन्यथा अपघात होऊ शकतो.
सोशल मीडियावर एका अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक पिकअप ट्रक एका ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक देताना दिसत आहे. यामध्ये ट्रॅक्टर चालकाची कोणतीच चूक नसल्याचं दिसत आहे. ट्रॅक्टर त्याच्य्या वेगात रस्त्यावरून जाताना व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. त्याच्यामागे एक ट्रक आहे. पुढच्या काही क्षणांत ट्रकनं ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की ट्रॅक्टर उलटला.
या अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाला नेमकं काय झालं ते समजू शकलेलं नाही. इन्स्टाग्रामवर हा फोटो व्हायरल झाला आहे. jayesh_jangid_rj04 नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. हा व्हिडीओ आतापर्यंत ७.७ मिलियन लोकांनी पाहिला आहे. ३.५ मिलियनहून अधिक लोकांनी व्हिडीओ लाईक केला आहे.