शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

त्रिवर्षपूर्तीचा लखलखता कर्तृत्वोत्सव

By admin | Published: May 30, 2017 1:25 AM

मोदी सरकारच्या तृतीय वर्षपूर्तीनिमित्त पक्षाध्यक्ष अमित शहांनी योजलेला खास कर्तृत्वोत्सव. देशभरातले भाषिक वृत्तपत्रांचे संपादक

सुरेश भटेवरा / लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : स्थळ : अशोका हॉटेलचा भव्य बॅन्क्वेट हॉल. कार्यक्रम : मोदी सरकारच्या तृतीय वर्षपूर्तीनिमित्त पक्षाध्यक्ष अमित शहांनी योजलेला खास कर्तृत्वोत्सव. देशभरातले भाषिक वृत्तपत्रांचे संपादक, दिल्लीतले त्यांचे विशेष प्रतिनिधी आणि काही मालक-संपादक अशांसाठी हा अनौपचारिक सोहळा योजला होता. निमंत्रितांच्या सरबराईसाठी स्वयंसेवकांची फौज पक्षाने तैनात केली होती. आलिशान सभागृहात कमल पुष्पांच्या सुवर्ण सजावटीसह सप्तरंगांनी नटलेला भलामोठा मंच. मंचाच्या दोन्ही टोकांपर्यंत एक अतिभव्य एलईडी स्क्रीन. समोर वर्तुळाकार टेबल्स व त्यावर निमंत्रितांच्या स्वागतासाठी शीतपेयांसह सुक्यामेव्याचे आतिथ्य. अमितभाई तब्बल उशिराच दाखल झाले. तोपर्यंत पत्रकारांशी गप्पाष्टकांचा किल्ला व्यंकय्या नायडूंनी नेहमीप्रमाणे लढवला. अमितभाई स्थानापन्न होताच, मोदी सरकारच्या तीन वर्षांतील यशाचे लखलखते सप्तरंगी सादरीकरण एलईडी स्क्रीनवर तासभर चालले. जोडीला प्रवक्ते नरसिंहा यांचे निरूपण सुरू होते. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपमध्ये सातत्याने तू तू मैं मैंचा प्रयोग सुरू आहे, याकडे लक्ष वेधता शहा म्हणाले, शिवसेनेचे मंत्री महाराष्ट्र आणि दिल्ली अशा दोन्ही सरकारांमध्ये आहेत. सरकारच्या प्रत्येक निर्णयात सेनेचा सहभाग आहे. मग आपणच घेतलेल्या निर्णयाविरुद्ध सेनेचे नेते बाहेर का बोलतात, हे अनाकलनीय आहे.  सत्ताधारी आणि विरोधकाची भूमिका एकाच वेळी वठवण्याची इतकी हौस कशासाठी, त्यातून काय साधायचे आहे, हे सेनेनेच ठरवायचे आहे.  देशात यातली प्रत्येक गोष्ट जणू प्रथमच घडते आहे, असा आभास नरसिंहांच्या भाषेतून होत होता.  काँग्रेसच्या कारकीर्दीशी प्रत्येक मुद्याची तुलना करीत मोदी सरकारचा ३ वर्षांचा तक्ता पुढे सरकत होता. देशभर २६ मेपासून असंख्य जाहिराती व मोठमोठ्या होर्डिंग्जद्वारे हीच माहिती सादर होत आहे. सादरीकरण संपताच अमित शहांसोबत स्वत:ची छबी कैद करण्यासाठी काही पत्रकार पिंगा घालू लागले. ज्यांना रस नव्हता ते दूर उभे होते व तटस्थपणे हा उत्साह न्याहाळत होते. स्वयंसेवक मात्र पत्रकारांमधल्या या दोन पंथांकडे बारकाईने नजर ठेवून होते.मग दिल्लीतले लोकप्रिय चाट अन् मिठाया आल्या. पाठोपाठ स्नेहभोजन आणि जोडीला अमित शाह यांच्याशी अनौपचारिक गप्पांची मैफीलही सुरू झाली. या मैफलीच्या मैदानात अखेरपर्यंत काही मराठी पत्रकारच टिकले. अत्यंत शांत व संयत स्वरात अमित शहा प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत होते. काही प्रश्नांबाबत ते मनोमन भडकल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवले. मात्र, बोलताना त्यांनी तोल ढळू दिला नाही. काश्मीर पूर्वी कधीही नव्हता इतका अशांत आहे, आपले सरकार याबाबत नेमके काय करते आहे, हा प्रश्न विचारताच शहांचा उत्साही चेहरा थोडा गंभीर झाला. मग करारी स्वरात ते म्हणाले, हातात बंदुका घेतलेल्या आणि दगडफेक करणाऱ्या लोकांबद्दल ना आम्हाला सहानुभूती आहे ना त्यांच्याशी चर्चा संवाद करण्याची आमची इच्छा आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी जो वेळ लागेल तो लागेल.  बंगाल, तेलंगणाही आम्ही जिंकूभाजपचा विस्तार आणि आगामी विधानसभा निवडणुकांबाबत विचारता अतिशय उत्साहाने शहा म्हणाले, यंदा गुजरात, हिमाचल, कर्नाटकच्या निवडणुका आम्ही जिंकणारच आहोत. याखेरीज पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणादेखील काही अवघड नाही. ही राज्येही लवकरच भाजपच्या अधिपत्याखाली आलेली तुम्हाला दिसतील. राणेच काय, अनेक जण उत्सुकभाजपमध्ये नारायण राणेंनी यावे यासाठी आपण आतुर आहात काय? असे विचारता सुरुवातीला हसत हसत शहा यांनी राणेंना फडणवीसांनी आपल्या गाडीतून लिफ्ट कशी दिली. त्यातून समज गैरसमज कसे घडत गेले याचा किस्सा सर्वांना ऐकवला. मग शहा इतकेच म्हणाले की, भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. मात्र, तूर्त याबाबत कोणताही निर्णय घ्यायचा नाही, असे आम्ही ठरवले आहे. कर्जमाफीबाबत सावध भूमिकामहाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सावधपणे बोलताना शहा म्हणाले, हा विषय कसा हाताळायचा याबाबत प्रत्येक राज्याची पद्धत भिन्न आहे. उत्तर प्रदेशशी तुलना करण्याऐवजी महाराष्ट्र सरकार या संदर्भात कोणता विचार करीत आहे, ते समजावून घेतले पाहिजे. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार कोण? याचे उत्तर सफाईने टाळताना ते म्हणाले की, आमच्या मनात कोणते नाव आहे, याचा अंदाज येणार नाही. राणेंबद्दल शहा म्हणाले की, भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. मात्र, तूर्त याबाबत कोणताही निर्णय घ्यायचा नाही, असे आम्ही ठरवले आहे.