ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ६ - भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अाडवाणी यांच्या पत्नी कमला अाडवाणी यांचे बुधवारी संध्याकाळी दिल्लीत ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांनी एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार त्यांना आज बुधवारी सकाळी छातीत दुखत असल्यानं दिल्लीतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. संध्याकाळच्या सुमारास ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने एम्स रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांचे हृदय बंद पडल्याने निधन झाल्याचे सांगितले. लालकृष्ण अडवाणीं 51 वर्षांपूर्वी कमला यांच्याशी विवाह बंधनात अडकले होते.
कमला अडवाणी यांचे वय ८३ वर्ष होते. त्यांच्या पश्चात पती लालकृष्ण अडवाणी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. मागच्या काही काळापासून वयोमानानुसार त्या प्रकृतीच्या विविध समस्यांनी त्रस्त होत्या तसेच मागच्या काही महिन्यांपासून त्या व्हीलचेअरवर होत्या.
कमला अडवाणी यांच्या निधनाची बातमी ऐकून प्रचंड दु:ख झाले. त्यांनी कार्यकर्त्यांना नेहमीच प्रेरणा दिली त्यांचा उत्साह वाढवला असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टि्वटमधून म्हटले आहे.
Deeply pained & saddened by Kamla Advani ji's demise. She always inspired & motivated Karyakartas & was LK Advani ji's pillar of strength.— Narendra Modi (@narendramodi) April 6, 2016
I recall my many interactions with Kamla Advani ji. My thoughts are with the Advani family in this hour of grief. May her soul rest in peace— Narendra Modi (@narendramodi) April 6, 2016