नवी दिल्ली : मद्यसम्राट विजय मल्ल्या याला ८,0४0 कोटींचे कर्ज संपुआ सरकारच्या काळात दिल्याचे वित्त राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी लोकसभेत सांगितले. ते म्हणाले की, ३१ डिसेंबर २0१६पर्यंत देशात हेतुत: कर्ज थकविणाऱ्यांची संख्या ९,१३0 होती. त्यांनी ९१,१५५ कोटींचे कर्ज थकवले आहे. मल्ल्याबाबत प्रश्नासंबंधी गंगवार म्हणाले की, ज्याचे नाव या प्रश्नात आहे, त्याला सप्टेंबर २00४मध्ये कर्ज दिले होते. २00८मध्ये त्याच्या आढावा घेतला. २00९मध्ये त्याचे ८,0४0 कोटींचे कर्ज अनुत्पादक मालमत्ता म्हणून घोषित झाले. २0१0 मध्ये एनपीएची पुनर्रचना करण्यात आली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
मल्ल्याला दिले संपुआनेच कर्ज
By admin | Published: March 18, 2017 2:22 AM