नवी दिल्लीः देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 90 हजारांच्या पुढे गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज कोरोनाचे 3,000 नवीन रुग्ण समोर येत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लादलेला लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आज संपुष्टात येत आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपण्यापूर्वी आरोग्य मंत्रालयाने शनिवारी वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हाधिका-यांसमवेत एक आढावा बैठक घेतली. बैठकीत लॉकडाऊन 4.0वर चर्चा झाली.बैठकीत लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात 30 जिल्हा व महापालिका क्षेत्रात कोणताही दिलासा दिला जाणार नसल्याचे ठरवण्यात आले आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, आरोग्य मंत्रालयाच्या आढावा बैठकीत या 30 जिल्ह्यांबाबत विशेष मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली असून, या जिल्ह्यांमध्ये कोणतीही सवलत न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारकडून लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात काही जिल्ह्यांना सवलती दिल्या जाऊ शकतात, तर कोरोना हॉटस्पॉट भागात आणखी कडक निर्बंध लागू केले जाऊ शकतात. सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, अतिसंक्रमित भागात हा साथीचा रोग टाळण्यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.सरकारने निवडलेल्या 30 नगरपालिका क्षेत्रांमध्ये गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, तेलंगणा, ओडिशा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पंजाब या राज्यांतील जिल्ह्यांचा समावेश आहे. या बैठकीत कोरोनाच्या सद्यस्थितीबद्दलही माहिती देण्यात आली, त्यामध्ये संक्रमित रुग्णांची संख्या, दुप्पट दर आणि कोरोना चाचणीसंदर्भातही चर्चा झाली आहे. या राज्यांतील 30 जिल्ह्यांना मिळणार नाही सूटराज्य शहर
महाराष्ट्र मुंबई, नाशिक, औरंगाबाद, ठाणे, पालघर, सोलापूर आणि पुणे
गुजरात बडोदरा, अहमदाबाद आणि सूरत
मध्य प्रदेश भोपाळ आणि इंदुर
आंध्र प्रदेश कुरनुल
तामिलनाडू विल्लुपुरम, चेंगलपट्टू, कुड्डालोर, अरियालुर, ग्रेटर चेन्नई आणि तिरुवल्लूर
राजस्थान जयपूर, जोधपूर, उदयपूर
दिल्ली जास्त करून रेड झोन भाग
ओडिशा बरहमपूर
पश्चिम बंगाल हावड़ा आणि कोलकाता
तेलंगणा ग्रेटर हैदराबाद
पंजाब अमृतसर
उत्तर प्रदेश आग्रा आणि मेरठ
अन्य महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : लॉकडाऊन 4च्या अंमलबजावणीसाठी मोदी सरकार तयार, मिळू शकते 'या' सेवांना परवानगी
Coronavirus: मजुरांच्या मनात विश्वास निर्माण करण्याची गरज- नितीन गडकरी