शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

Lockdown 5.0 : केंद्राची नवीन नियमावली प्रसिद्ध; जाणून घ्या कोणती सूट मिळणार अन् कशावर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 6:59 PM

मोदी सरकारनं लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यासाठी नवी नियमावली जारी केली...

नवी दिल्लीः मोदी सरकारनं लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यासाठी नवी नियमावली जारी केली असून, यात अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने लॉकडाऊन 5.0 साठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. याअंतर्गत कंटेन्मेंट झोनच्या बाहेर असलेल्या ठिकाणांना टप्प्याटप्प्याने सूट दिली जाणार आहे, परंतु सध्या यावर पूर्णपणे बंदी राहील. ही नियमावली 1 जून ते 30 जूनपर्यंत लागू राहील. देशातील लॉकडाऊनही वाढवण्यात आला आहे. सध्याचा रात्रीचा कर्फ्यू सुरूच राहणार असून, अत्यावश्यक वस्तूंसाठी कोणताही कर्फ्यू असणार नाही. रात्रीच्या ९ वाजल्यापासून पहाटे ५ वाजेपर्यंत नाइट कर्फ्यू राहील. सध्या संध्याकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत हा कर्फ्यू आहे.शाळा-महाविद्यालये व शैक्षणिक संस्था सुरू करण्यावर सरकार कालांतरानं निर्णय घेणार आहे. कंटेन्मेंट झोनवगळता इतर भागात धार्मिक स्थळं, हॉटेल्स अन् मॉल ८ जूनपासून सुरू होणार आहेत. आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणं, मेट्रो रेल्वे, सिनेमा हॉल, व्यायामशाळा, जलतरण तलाव, उद्याने इत्यादी सुरू करण्यासंदर्भात परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे.नवीन निर्देश 1 जून 2020पासून अंमलात येतील आणि 30 जून 2020 पर्यंत लागू राहतील. 24 मार्च 2020 नंतर संपूर्ण देशात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला. केवळ अत्यावश्यक सेवांनाच परवानगी देण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागात धार्मिक स्थळे, हॉटेल, रेस्टॉरंट्स, शॉपिंग मॉल्स 8 जून 2020 पासून उघडण्यास परवानगी देण्यात आली. आरोग्य मंत्रालय यासंदर्भात एसओपी जारी करणार आहे. दुसर्‍या टप्प्यात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या परवानगीनंतर शाळा आणि महाविद्यालये उघडली जाणार आहेत. म्हणजेच शाळा उघडण्याचा निर्णय केंद्रानं राज्यांवर सोपवला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या