LockdownNews: काँग्रेसचा स्थलांतरित मजुरांच्या भावनांशी खेळ; योगी सरकारला पाठवलेल्या बसेसच्या यादीवर झाला मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 01:38 PM2020-05-19T13:38:58+5:302020-05-19T13:59:08+5:30
लखनौ : स्थलांतरित मजुरांच्या व्यवस्थेसाठी काँग्रेसने राज्य सरकारकडे बसेसची यादी दिली आहे. मात्र, या यादीत अनेक नंबर तीनचाकी, दुचाकी ...
लखनौ : स्थलांतरित मजुरांच्या व्यवस्थेसाठी काँग्रेसने राज्य सरकारकडे बसेसची यादी दिली आहे. मात्र, या यादीत अनेक नंबर तीनचाकी, दुचाकी आणि कारचे आहेत, असा खळबळ जनक दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सल्लागार मृत्युंजय कुमार यांनी केला आहे. एवढेच नाही, तर मृत्युंजय कुमार यांनी ही यादीही जाहीर केली आहे.
प्रियंका गांधींनी दिला होता 1000 बसेस देण्याचा प्रस्ताव -
काँग्रेसच्या सरचिटनीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी यूपी सरकारकडे मजुरांना घरी जाण्यासाठी काँग्रेसकडून 1000 बसेस देण्याचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव स्वीकारत योगी आदित्यनाथ यांनी प्रियंका गांधींना या बसेसची यादी राज्य सरकारकडे सादर करण्यास सांगितले होते.
'ति'ने माझ्यावर 10 वर्ष 'बलात्कार' केला, युवकाने सांगितली अत्याचाराची कहाणी
बसेसच्या ऐवजी दिले तीनचाकी गाड्यांचे नंबर -
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सल्लागार मृत्युंजय कुमार यांनी आता, दावा केला आहे की, या यादीत घालमेल करण्यात आली आहे. काँग्रेसने दिलेल्या यादीचा उल्लेख करत त्यांनी एका गाडीच्या रजिस्ट्रेशन नंबरचाही उल्लेख केला. 10 नोव्हेबर 2016 रोजी रजिस्टर झालेली गाडी क्रमांक यूपी 83 टी1006 ही बस नसून थ्री व्हीलर आहे, असे ते म्हणाले.
याच पद्धतीने आरजे 14 टीडी 1446 एक बस नसून कार आहे. इतर दोन-तीन वाहनांच्या बाबतीतही असेच आहे, असेही मृत्युंजय कुमार म्हणाले.
अशीच एक गाडी, रजिस्ट्रेशन क्रमांक यूपी 85 टी 6576 ही बस नसून एक स्कुटर आहे, अशी माहितीतीही मृत्युंजय कुमार यांनी दिली आहे.
यूपी सरकारने प्रियंका गांधी यांच्या खासगी सचिवाला पत्र लिहून काँग्रेसकडून पाठवण्यात येणाऱ्या एक हजार बसेसचे फिटनेस प्रमाण पत्र, रजिस्ट्रेशन नंबर, ड्रायव्हर आदी संदर्भात संपूर्ण माहिती मागवली होती. यानंतर काँग्रेसने गाड्यांची यादी यूपी सरकारला पाठवली होती.
जगातील 10 सर्वात भयंकर चक्रीवादळं; यांच्या विनाशाचे तांडव आठवले, की आजही उडतो लोकांचा थरकाप
याच पार्श्वभूमीवर भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी ही एक ट्विट केले आहे.
प्रियंका वाड्रा ने जो “तथाकथित” बसों की लिस्ट सौंपी है ..उसमें काफ़ी गाड़ियाँ “unfit” है ..कुछ Ambulance है,कुछ Car,कुछ ट्रैक्टर और स्कूटर
— Sambit Patra (@sambitswaraj) May 19, 2020
RJ 27 PA 9852 ambulance
RJ14TD 1446 CAR
RJ40PA 0186 THREE Wheeler
RJ40PA 0123 AUTO RICSHA
RJ34 PA 2938 AUTO
RJ14PA 1932 AUTO
इस में भी घोटाला
CoronaVirus News: बापरे! कोरोनाचे नियम तोडले तर 'हा' मुस्लीम देश देणार जगातील सर्वात मोठी शिक्षा
काँग्रेसकडून देण्यात आलेल्या बसेसच्या यादीत घालमेल असल्याच्या मुद्यावर यूपी सरकारचे प्रवक्ता सिद्धार्थनाथ सिंह यांच्या घरी एक बैठक सुरू असल्याचे समजते. या बैठकीला लखनौचे आयुक्त आणि डीएमसह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.