कोरोना व्हायरसच्या संकटामुळे सर्वत्र गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रसार थांबत नसल्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला. या लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणी लोकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेकजण आपल्या घरापासून लांब वेगवेगळ्या ठिकाणी अडकले आहेत. अशावेळी गोरगरीब लोकांसाठी देवदूत बनण्याचं काम पोलीस करताना दिसत आहेत. पोलिसांनी गोर-गरीबांना मदतीचा हात दिल्याच्या अनेक घटना तुम्हाला माहीत असतील. अशीच घटना उत्तरप्रदेशात घडली आहे. पोलिसांनी नाईलाजाने एका महिलेला खांदा दिला आहे.
उत्तर प्रदेशातील सहारनपूर इथली घटना आहे. एका निराधार महिलेला पोलिसांनी आजारपणात साथ दिली इतकंच नाही तर शेवटच्या श्वासांपर्यंत तिची सेवा केली आहे. अखेरीस या महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या पार्थिवाला खांदा देण्याचं काम पोलीसांनी केलं. बुडगाव शहरातील किशनपुरा गावात राहणाऱ्या एका विधवा महिलेला लॉकडाऊनमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं. अशाचत ती आजारी पडली. कोणीही नातेवाईक नसल्यामुळे पोलिस काळजी घेत होते. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. दिपक चौधरी यांनी आपल्या पोलिस साथीदारांसह किशनपूर गावात शोक व्यक्त केला. त्यांनी या महिलेच्या पार्थिवाला खांदा देऊन अंत्ययात्रा काढली. ( हे पण वाचा-बाबो! माहेरी गेलेली पत्नी लॉकडाऊनमुळे तिकडेच अडकली, पतीने गर्लफ्रेन्डसोबत लगेच उरकून टाकलं दुसरं लग्न!)
सोशल डिस्टन्सिंगचं भाग राखून पार्थिवावर अंत्यसंस्कारही केले. पोलिसांनी या महिलेच्या पार्थिवाला खांदा दिल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडीयावर हा व्हिडीओ पाहून पोलीसाचं कौतुक केलं जात आहे. ( हे पण वाचा-लय भारी! लॉकडाऊनमुळे कोल्हापूरच्या जवानाचं ऑनलाइन शुभमंगल सावधान...)