नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनमुळे अनेक मजुरांना त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांत मजूर आपल्या घरी परतण्यासाठी पायी चालताना, ट्रकवरून लटकलेले किंवा बस-ट्रेनने जाताना दिसून आले. मात्र, आता मजूर विमाननेही आपल्या घरी परतत आहेत.
दरम्यान, विमानातून प्रवास करणाऱ्या मुजरांच्या चेहऱ्यावर घरी परतण्याचा आनंद स्पष्टपणे दिसून येत आहे. "मी विमानात बसू शकेन, असा विचारही केला नव्हता. हे मालकांमुळे शक्य झाले," असे दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या एका मजुरांने दिल्लीतील आयजीआय विमानतळावर दाखल झाल्यानंतर सांगितले.
लॉकडाऊनमध्ये गेल्या काही दिवसांत कंपनी मालकांनी काम बंद असल्यामुळे मजुरांची साथ सोडल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, एक व्यक्ती आहे, ती १० मजुरांसाठी मशीहा म्हणून पुढे आली आहे. पप्पन गहलोत असे या व्यक्तीचे नाव आहे. पप्पन गहलोत यांच्याकडे हे सर्व मजूर काम करत होते. या मजुरांसाठी पप्पन गहलोत यांनी स्वत: पैसे खर्च करून विमानाचे तिकीट मिळविले आणि घरी पाठविले. यासाठी त्यांनी जवळपास ६८ हजार रुपये इतका खर्च आला.
पप्पन गहलोत हे मशरूमची शेती करतात. त्यांच्याजवळ या मुजरांपैकी काहीजण गेल्या २० वर्षांपासून काम करतात. सध्याच्या कोरोना संकटाळात या मजुरांना घरी जायचे होते. यासाठी त्यांनी सुरुवातीला रेल्वेचे तिकिट मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु ते अयशस्वी झाले. त्यानंतर विमानाचे तिकीट खरेदी केल्यानंतर या मजुरांना पटनासाठी रवाना केले. दरम्यान, पप्पन गहलोत यांच्या भाऊ निरंजन गहलोत विमानतळापर्यंत सोडण्यासाठी आला होता, असे या सर्व मजुरांनी सांगितले.
आणखी बातम्या...
पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; जवानांनी वेळेत कारमधील IED केलं डिफ्यूज
Corona News in Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधित, संख्या पोहोचली १९ वर
हिपॅटायटीस सी आणि एचआयव्हीचे औषध कोरोनावर मात करण्यासाठी प्रभावी, भारतीय वैज्ञानिकांचा दावा
धक्कादायक! पॅरोलवर सुटल्यानंतर काही तासांत आरोपीचा खून
पहिल्यांदाच विमानाने मजुरांची घरवापसी; १७७ प्रवासी झारखंडला रवाना