नवी दिल्ली: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी सरकारने देशव्यापी लॉकडाउन जाहीर केले असले तरी त्याचा सर्वाधिक फटका हा हातावर पोट असणाऱ्या मजुरांना बसत आहे. हाताला कोणतेही काम नसल्यामुळे त्यांचे शहरांमध्ये राहणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत मोठ्या संख्येने परप्रांतीय कामगार आपल्या गावी परतत आहेत. जेएनयूचे माजी विद्यार्थी नेते कन्हैया कुमार यांनी कामगारांच्या या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.कन्हैया यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले आहे की, परप्रांतीय मजुरांना शहरातील नागरिक बाहेरचे म्हणतात आणि खेड्यातून स्थलांतर केल्यामुळे ते तिथे परदेशी होतात. लॉकडाऊनमुळे त्यांना शहरात राहण्याची सोय नाही आणि साथीच्या भीतीमुळे त्यांना गावात प्रवेश दिला जात नाही, स्वत:च्या देशात या प्रवासी बनलेल्या मजुरांची अशी व्यथा आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
"आताचं संकट मोदींना झेपणारं नाही; त्यांनी सर्वपक्षीय सरकार स्थापन करावं"
Lockdown News: आजपासून ५ दिवसांसाठी मोदी सरकारची योजना; घरबसल्या करा स्वस्तात सोनं खरेदी!
पाक दहशतवादी आज काश्मीरमध्ये मोठा हल्ला करण्याची शक्यता; ११ मे हाच दिवस का निवडला?
ड्रॅगन संपूर्ण एव्हरेस्ट गिळंकृत करायच्या मार्गावर; नेपाळनं उठवला आवाज