भाजपशासित मध्य प्रदेशात अनेक शहरांत लॉकडाऊन, २२ एप्रिलपर्यंत वाढविला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 05:33 AM2021-04-11T05:33:14+5:302021-04-11T07:07:26+5:30

Madhya Pradesh : विशेष म्हणजे, महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्याची चर्चा सुरू असताना भाजपने राज्यातील लॉकडाऊनला विरोध दर्शविला आहे. मात्र, शेजारच्या भाजपशासित मध्य प्रदेशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

Lockdown in several cities in BJP-ruled Madhya Pradesh extended till April 22 | भाजपशासित मध्य प्रदेशात अनेक शहरांत लॉकडाऊन, २२ एप्रिलपर्यंत वाढविला

भाजपशासित मध्य प्रदेशात अनेक शहरांत लॉकडाऊन, २२ एप्रिलपर्यंत वाढविला

Next

भोपाळ : इंदूरसह अनेक शहरांतील लॉकडाऊन १९ एप्रिलपर्यंत वाढविण्याचा निर्णय मध्यप्रदेश सरकारने शनिवारी घेतला. अपर मुख्य सचिव (गृहविभाग) राजेश राजौरा यांनी पत्रकारांना सांगितले की, मध्यप्रदेश सरकारने काही जिल्ह्यांतील लॉकडाऊन २२ एप्रिलपर्यंत वाढविले आहे. 
विशेष म्हणजे, महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्याची चर्चा सुरू असताना भाजपने राज्यातील लॉकडाऊनला विरोध दर्शविला आहे. मात्र, शेजारच्या भाजपशासित मध्य प्रदेशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. 
याआधी राज्यातील शहरी भागात शुक्रवारी संध्याकाळपासून सोमवारी सकाळपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समित्यांच्या बैठकांत लॉकडाऊनला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. 
 जबलपूरसह बालाघाट, नरसिंहपूर आणि सिवनी जिल्ह्यांत १२ एप्रिलच्या रात्रीपासून २२ एप्रिलच्या सकाळपर्यंत लॉकडाऊन असेल. 
राजौरा यांनी सांगितले की, यासंबंधी सीआरपीसी कलम १४४ अन्वये संबंधित जिल्हाधिकारी कायदेशीर आदेश जारी करतील.

निर्बंध कुठे, किती?
इंदूर शहरात शुक्रवारी संध्याकाळी सुरू होणारे लॉकडाऊन आता सोमवारी संपणार नाही. त्याऐवजी ते १९ एप्रिल रोजी सकाळपर्यंत लागू राहील.  याशिवाय शाजापूर, उज्जैन, बडवानी, राजगढ आणि  विदिशा जिल्ह्यांतील लॉकडाऊनही १९ एप्रिलच्या सकाळपर्यंत  वाढविण्यात आले.

Web Title: Lockdown in several cities in BJP-ruled Madhya Pradesh extended till April 22

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.