रांची - केंद्र सरकारने लॉकडाउनसंदर्भात सर्व अधिकार राज्य सरकारला दिल्यानंतर, देशातील बहुतांश राज्यात अनलॉक फेजमध्ये लॉकडाउन सुरु आहे. यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीनुसार देशात 30 जूनपर्यंत लॉकडाउन असून काही अटी व शर्तीसंह सूट देण्यात आली आहे. झारखंड सरकारने शुक्रवारी एक आदेश जारी केला असून राज्यातील लॉकडाउन 31 जुलै 2020 पर्यंत वाढविण्यात आले आहे. यापूर्वीच्या अटी व शर्ती या लॉकडाउनमध्ये कायम राहणार असल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे.
राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस होत असलेली वाढ लक्षात घेऊन सरकारने लॉकडाउन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील अनेक राज्यांनी 31 जुलैपर्यंत लॉकडाउन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही लॉकडाउन वाढविण्यात आल्याची घोषणा केली आहे. झारखंडमध्ये यापूर्वी 25 जूनपासून कंटेनमेंट झोन व्यतिरिक्त इतर ठिकाणी सूट देण्यात आली आहे. मात्र, या लॉकडाउनमध्ये बससेवा, सलून आणि सार्वजिनिक सोहळ्यांना बंदी कायम ठेवण्यात आली आहे. राज्यातील विविध विभागांच्या सचिवांसोबत झालेल्या बैठकीनंतर मुख्य सचिव सुखदेवसिंह यांच्या सहीने हा लॉकडाउन वाढविण्यात आल्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशात ई- कॉमर्सवरील बंदी उठविण्यात आली आहे.
सरकारने यापूर्वी बंदी घातलेल्या आस्थापनांवर यापुढेही बंदी कायम राहणार आहे. त्यामुळे, धार्मिक ठिकाणी सर्वसामान्य लोकं नेहमीप्रमाणे एकत्र येऊ शकणार नाहीत. नेहमीप्रमाणे पूजा होणार नाहीच. सामाजिक उपक्रम, राजकीय, खेळ, मनोरंजन, अॅकेडमिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांसह यात्रांनाही बंदी कायम ठेवण्यात आली आहे. तसेच, शाळा, महाविद्यालये, शिक्षणसंस्था, कोचिंग क्लासेस, सिनेमा हॉल, स्विमिंग पूल हे सर्वकाही बंदच राहणार आहे.
संबंधित बातम्या
Video: शहिदांना श्रद्धांजली वाहतानाच राडा, काँग्रेसच्या 2 कार्यकर्त्यांची हाणामारी
बाबो! लग्नाच्या ९ वर्षांनंतर समजले पत्नी 'पुरूष' आहे; पतीला बसला मानसिक धक्का
वादळी पावसात वीज पडून 129 जणांचा मृत्यू, मोदींकडून शोक व्यक्त