बालाघाट - कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु आहे. मात्र, या लॉकडाऊनमुळे अनेकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. सर्वात जास्त त्रास अनेक राज्यांत अडकलेल्या मजुरांना सोसावा लागत आहे. अशा परिस्थिती अनेक मजुरांनी आपल्या गावी जाण्यासाठी पदयात्रा करण्याचा निर्णय घेतला आहे.
अशाचप्रकारे एका हैदराबादमध्ये कामाला असणारा बालाघाट येथील एक मजूर जवळपास ८०० किलोमीटरचे अंतर पायी कापत आपल्या घरी पोहोचला. यावेळी प्रवासदरम्यान त्यांच्यासोबत त्याची ८ महिने गर्भवती असलेली पत्नी आणि दोन वर्षांची मुलगी होती. लांब पल्ल्याचा प्रवास असल्यामुळे या मजुराने वाटेत लाकूड आणि बांबूच्या सहाय्याने एक गाडी तयार केली. या गाडीवर पत्नी आणि मुलीला बसवून ती ओढत त्याने ८०० किलोमीटरचे अंतर कापले.
रामू असे या मजुराचे नाव आहे. रामू आपल्या दोन वर्षांच्या मुलीला आणि गर्भवती पत्नीला एका लाकडाच्या गाडीवर बसवून ती ओढत हैदराबादहून १७ दिवसांचा प्रवास करत बालाघाटमध्ये पोहोचला. जिल्ह्यातील राजेगाव सीमेवर हे दाम्पत्य गर्भवती पत्नीसह पोलिसांना दिसले. त्यावेळी लहान मुलीच्या पायात चप्पलही नव्हती, पोलिसांनी तिला खायला बिस्किटे आणि चप्पल दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना घरी जाण्यासाठी एका खासगी गाडीची व्यवस्था केली. त्यानंतर घरी आल्यानंतर रामूने सांगितले की, घरी परतण्यासाठी सर्व प्रयत्न केले. मात्र, याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यानंतर पायी चालत येण्याचा निर्णय घेतला.
लांजीचे एसडीओपी नितेश भार्गव यांनी सांगितले की, "हा मजूर बालाघाट सीमेजवळ दिसला. तो आपली पत्नी धनवंतीसोबत हैदराबादहून पायी चालत येत होता. त्यांच्यासोबत एक २ वर्षांची मुलगीही होती. तिला लाकडी गाडीत बसवून ती ओढत इथपर्यंत आला होता. आम्ही त्याच्या मुलीला चप्पल आणि बिस्किटे दिली, त्यानंतर त्यांना एक खासगी गाडीमधून सीमेजवळील खेड्यात पाठविले आहे."
आणखी बातम्या...
CoronaVirus News : बापरे! ज्याच्या घरात चोरी केली तोच निघाला कोरोना पॉझिटिव्ह; मग...
CoronaVirus News : रिक्षातून केला तब्बल 1500 किमीचा प्रवास पण घरजवळ येताच...; मन सुन्न करणारी गोष्ट
CoronaVirus News : "हजारो मुलं-मुली रस्त्यावर... आज भारत माता रडतेय"
CoronaVirus News : मंत्री शिंकले, सगळेच घाबरले अन् पुढे झालं असं काही...
CoronaVirus News : ... म्हणून 50 हजार गर्भवतींची होणार कोरोना टेस्ट; 'या' राज्याने घेतला निर्णय