नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने जगाला विळखा घातला आहे. जगातील अनेक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. व्हायरसच्या संकटाने आव्हान उभं केलं असतानाच आता आणखी एक मोठं संकट देशावर येत असल्याची माहिती समोर आली आहे. देशात टोळधाड धडकणार असल्याची चिंताजनक माहिती मिळत आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा देशात टोळधाडीचं संकट येणार असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने दिला आहे.
येत्या दोन आठवड्यांमध्ये पुन्हा एकदा भारतावर टोळधाडीचं मोठ्या प्रमाणात आक्रमण होऊ शकतं. पश्चिमेकडून चार हजार किलोमीटर दूरवरून हा टोळधाडीचा हल्ला सुरू झाला आहे. मान्सूनपूर्वी मे महिन्यात टोळधाड दक्षिण-पश्चिम पाकिस्तानातून राजस्थानात दाखल झाली. मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात शिरले आहेत. मध्यप्रदेशाच्या सीमेवरून मोर्शी, वरूड व मेळघाटात टोळधाड दाखल झाली. वाळवंटी टोळांनी राज्यातील 20 जिल्ह्यांतील 90 हजार हेक्टरवरील पिके फस्त केली. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात टोळधाडीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं.
FAO ने दिलेल्या माहितीनुसार, भारतात टोळधाड राजस्थानमध्ये येण्याची शक्यता आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी पूर्वतयारी केली तर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात होणारं नुकसान टाळता येऊ शकतं असं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी जुलैमध्ये पुन्हा एकदा देशात टोळधाडीचं संकट येणार असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने दिला होता. त्यानंतर केंद्राने राजस्थान आणि मध्य प्रदेशसह 16 राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला.
तज्ज्ञांच्या मते पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमधील शेती खराब करणारे टोळधाड एप्रिलमध्ये पाकिस्तानातून भारतात आले. उत्तर-पूर्व सोमालियाला पोहोचणारे टोळधाड उत्तर हिंद महासागरातील भारत-पाकिस्तान सीमा भागात प्रवेश करणार आहे. शेतावर पिके कमी असल्यामुळे टोळ सध्या झाडे आणि अन्य खाद्यपदार्थांना लक्ष्य बनवीत आहेत. पिकांची अनुपलब्धता असल्यामुळेच टोळ पाकिस्तानातून इतके अंतर पार करून भारताच्या विविध राज्यांत शिरले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबू यांच्या पत्नी झाल्या उपजिल्हाधिकारी
CoronaVirus News : भयंकर! कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूनंतर कुटुंबाने पेटवून दिली रुग्णवाहिका
CoronaVirus News : कोरोना वॅक्सीन नेमकी कधी उपलब्ध होणार?, WHO ने दिली महत्त्वाची माहिती
"वचन होतं राम राज्याचं, दिलं गुंडाराज"; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल