लोहरदगा - देशावर कोरोनाचं संकट आलेलं असतानाच माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहे. झारखंडच्या लोहरदगा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. काही अज्ञातांनी स्मशानभूमीत एका नवजात बाळाला जिवंत पुरल्याचा भयंकर प्रकर घडला आहे. स्मशानभूमीतून अचानक बाळाच्या रडण्याचा आवाज आल्याने ही घटना समोर आली आहे. वेळीच हा प्रकार समजल्याने बाळाचा जीव वाचवण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुरू पोलिस स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे. चंदलासो धरणाजवळील स्मशानभूमीत शनिवारी सायंकाळी एका नवजात बाळाला जिवंत पुरण्यात आले. स्मशानभूमीजवळून जात असताना एका व्यक्तीला बाळाच्या रडण्याचा आवाज आला. या व्यक्तीने घटनास्थळी जाऊन पाहिले तेव्हा त्याला एक बाळ कोणीतरी मातीत पुरल्याचं दिसलं. बाळावर माती टाकण्यात आली होती.
व्यक्तीने नवजात बाळाला मातीतून सुखरूप बाहेर काढलं आणि बाळाचा जीव वाचवला आहे. स्मशानभूमीत बाळाला पुरल्याची माहिती मिळताच कुरू पोलिस स्टेशनचे प्रभारी अनिरुद्ध मुरारी कुमार घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला. याप्रकरणी चौकशी सुरू असून बाळाच्या आई-वडिलांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
बापरे! मुलाने घरातून चोरले गहू, वडिलांनी दिली भयंकर शिक्षा
घरापासून 15 किमी अंतरापर्यंत आता हेल्मेटची गरज नाही?, जाणून घ्या 'त्या' व्हायरल मेसेजमागचं सत्य
CoronaVirus News : शाळा सुरू करणं 'या' देशाला पडलं महागात; 11 जण पॉझिटिव्ह, 268 क्वारंटाईन
CoronaVirus News : 'पापड खाओ, कोरोना भगाओ' म्हणणारे मोदींचे मंत्री कोरोना पॉझिटिव्ह
आत्मनिर्भर भारत! 101 संरक्षण उत्पादनांवर आयात बंदी; राजनाथ सिंहांची मोठी घोषणा
"देश जेव्हा जेव्हा भावूक झाला, त्यावेळी फाईल्स गायब झाल्या"
Breaking: विजयवाडामध्ये कोविड सेंटरला भीषण आग; 7 जणांचा मृत्यू