मेलबोर्न : भारतात लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक व विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यावर सगळ्या राजकीय पक्षांमध्ये एकमत होऊन आवश्यक ती घटनात्मक दुरुस्ती झाल्यास ती जबाबदारी पार पाडण्यास निवडणूक आयोग तयार आहे, असे मुख्य निवडणूक आयोग नसीम झैदी यांनी म्हटले. आॅस्ट्रेलियाच्या निवडणूक व्यवस्थेची ओळख जगातील १९ निवडणूक आयुक्तांना करून देण्यासाठी आॅस्ट्रेलियाच्या निवडणूक आयोगाने येथे आयोजित इंटरनॅशनल इलेक्शन व्हिजिटर्स प्रोग्रॅम आयोजित केला होता. त्यास उपस्थित राहण्यासाठी नसीम झैदी आले होते. आम्ही एकाच वेळी निवडणुका घेण्याची शिफारस संसदीय समितीलाही केली. या शिफारशीचा समितीने अभ्यास केला आहे. हा प्रश्न सर्व राजकीय पक्षांनी चर्चा करण्याचा आहे. (वृत्तसंस्था)आयोगाने केली कायदा मंत्रालयाकडे शिफारसदेशात लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या जाऊ शकतात, अशी शिफारस आयोगाने कायदा मंत्रालयाकडे केलेली आहे, असे झैदी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. ते म्हणाले की, या निवडणुका एकाच वेळी घ्यायच्या असतील, तर आम्हाला इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे आणि तात्पुरता कर्मचारी वर्ग मिळविणे तसेच निवडणूक तारखांचा मेळ घालणे आवश्यक आहे.
लोकसभा, विधानसभा एकाच वेळी
By admin | Published: July 06, 2016 1:38 AM