पेमा खांडू यांच्या ताफ्यातून 1.80 कोटी रुपये जप्त, काँग्रेसचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 11:49 AM2019-04-03T11:49:52+5:302019-04-03T15:58:44+5:30
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यावर काँग्रेसकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यावर काँग्रेसकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. बुधवारी नवी दिल्लीत काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली. यावेळी रणदीप सुरजेवाला यांनी मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या ताफ्यातील एका कारमधून 1.80 कोटी रुपये जप्त करण्यात आल्याचे सांगितले.
रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या ताफ्यातील कारमध्ये 1.80 कोटी रुपये जप्त करण्यात आले, यासंबंधीचा व्हिडीओ दाखविला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत चौकीदाराची चोरी पकडण्यात आली, असे रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.
Randeep Surjewala, Congress: Even as PM Modi addressed an election rally in Pasighat, Arunachal Pradesh today, a sensational ‘Cash for Vote Scandal’ is exposed where authorities found Rs. 1.8 crore from the convoy of BJP CM Pema Khandu & BJP Arunachal Pradesh President Tapir Gao. pic.twitter.com/wnbQ8XTUXN
— ANI (@ANI) April 3, 2019
याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अरुणाचल प्रदेशात प्रचारसभा आहे. मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या ताफ्यातील कारमध्ये जप्त करण्यात आलेल्या पैशांचा वापर हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारसभेत लोकांची गर्दी वाढवण्यासाठी करण्यात येणार होता, असा आरोप रणदीप सुरजेवाला यांच्याकडून करण्यात आला आहे.