नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पुन्हा एकहा जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित झाला. मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांना चांगलच सुनावलं. 'एक चिन्ह, एक पंतप्रधान, एक संविधान', ही राजकीय घोषणा नाही, असं गृहमंत्री अमित शहा यावेळी म्हणाले.
सौगता रॉय यांच्या कमेंटला शहांचं प्रत्युत्तर'एक चिन्ह, एक पंतप्रधान, एक संविधान, ही राजकीय घोषणा आहे' असे वक्तव्य टीएमसी खासदार सौगता रॉय यांनी लोकसभेत केले. यावर गृहमंत्री अमित शहा तात्काळ उठले आणि या टिप्पणीवर रॉय यांना उत्तर दिले. 'देशात दोन पंतप्रधान, दोन संविधान आणि दोन ध्वज असू शकत नाही. सौगता रॉय यांचे वक्तव्य आक्षेपार्ह आहे.' तसेच, 'दादा तुमचं वय झालं आता,' अशी मिश्कील टीकाही त्यांनी यावेळी केली.
जम्मू-काश्मीरमधधून कलम 370 रद्द करण्याबाबतच्या टिप्पणीला उत्तर देताना अमित शहा म्हणाले, 'ज्यांनी हे केले होते, ते चुकीचे होते. नरेंद्र मोदींनी जे केले, ते योग्यच आहे. आम्हाला तुमच्या सहमती किंवा असहमतीने फरक पडत नाही. संपूर्ण देशाला जे हवे होते, ते भाजपने केले. देशात एक पंतप्रधान, एक ध्वज आणि एकच संविधान असावे, असे आम्ही 1950 पासून म्हणत आलो आहोत आणि तसेच केले आहे.'