नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी दोन दिवस शिल्लक राहिले आहे. त्यापूर्वीच सत्ताधारी आणि विरोधकांची धावपळ सुरु झाली आहे. निवडणूक आयोगाकडून मतमोजणीची तयारी सुरु झाली आहे. त्यातच, मंगळवारी 21 विरोधीपक्षांचे नेते निवडणूक आयोगाची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. टीडीपीचे प्रमुख चंद्रबाबू नायडू हे याच नेतृत्व करणार आहे. ईव्हीएम बाबत या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीचे 23 रोजी होणारी मतमोजणी अत्यंत पारदर्शीपणाने, काळजीपूर्वक व अचूकतेने पूर्ण करण्यासाठी निवडणूक यंत्रणा सुसज्ज झाली आहे. त्याधीच, आता विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. मंगलवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास विरोधीपक्षाचे नेते निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे. मतमोजणीच्या वेळी एखाद्या बूथच्या आकडेवारीत जर विसंगत आढळून आली तर, त्या विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यांचा डेटा जुळवून घ्यावा अशी मागणी यावेळी विरोधीपक्षाकडून करण्यात येणार आहे.
टीडीपी प्रमुख चंद्रबाबू नायडू हे विरोधीपक्षाचे नेतृत्व करणार आहेत. यावेळी कॉंग्रेसचे अहमद पटेल, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार,बसपा नेते सतीश चंद्र मिश्रा,कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सीताराम येचुरी, तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ'ब्रायन यांची उपस्थिती राहणार आहे.
याआधी, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी निवडणूक आयोगासोबत सोमवारी बैठक घेतली होती. कार्यकर्त्यांसोबत झालेल्या मारहाण प्रकरणी निवडणूक आयोगाशी यावेळी चर्चा करण्यात आली होती. तसेच, लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्यावेळी ज्या ठिकाणी हिंसा घडली तिथे पुन्हा मतदान घ्यावे अशी मागणी निवडणूक आयोगाकडे पियुष गोयल यांनी केली होती.