मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अक्षय कुमारला वैयक्तिक जीवनाशी संबंधित प्रत्येक पैलूबद्दल मुलाखत दिली. मुलाखातीत पंतप्रधान मोदींनी आपल्या आईबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या. अक्षयच्या मुलाखातीत एका प्रश्नाचे उत्तर देत मोदी म्हणाले की, त्यांची आई त्यांना भेटल्यावर आज सुद्धा सव्वा रुपया देतात.
प्रत्येक महिन्याला होणाऱ्या पगारातून तुमच्या आईसाठी तुम्ही काही पैसे पाठवतात का ? असा प्रश्न अक्षयने विचारला. अक्षयच्या प्रश्नाला उत्तर देतांना मोदी म्हणाले, माझी आई स्वतः मला पैसे देते. मी ज्यावेळी त्यांना भेटेल त्यावेळी मला सव्वा रुपया त्यांच्याकडून मिळत असतो. त्या कधीच आमच्याकडून अपेक्षा करत नाही व त्यांना गरज सुद्धा नाही. एकमेव मी असा मुख्यमंत्री आणि पंतप्रधान ठरलो की, कुटुंबासाठी कधीच सरकरी पैसे वापरले नाही. अक्षयला दिलेल्या मुलाखतीत मोदी बोलत होते.
मोदींना केलेला हा दावा खरा आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतो. मोदींना सव्वा रुपयाचा उल्लेख केला आहे मात्र २५ पैसे चलनातून बाद करण्यात आले आहे. त्यामुळे, मोदी खोट बोलत आहे का असा प्रश्न सोशल मिडियावर विचारला जात आहे. दुसरीकडे, २३ एप्रिलला पंतप्रधान मोदी गुजरातला मतदान करण्यासाठी गेले असता त्यांनी आईची भेट घेतली. यावेळी त्यांच्या आईनी त्यांना ५०० रुपायची नोट दिली. त्यामुळे सव्वा रुपयाचा मोदींचा दावा खरा की खोटा यावर आता चर्चा रंगत आहे.
अक्षय कुमारने घेतलेल्या मुलाखतीतून मोदींच्या वैयक्तिक जीवनाशी निगडीत अनेक गोष्टी पहिल्यांदाच समोर आल्या. पण असे असतांना याच मुलाखतीत मोदींनी केलेल्या सव्वा रूपयाची दाव्यामुळे सोशल मिडियावर उलटसुलट चर्चा पहायला मिळत आहे.