नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीनंतर जाहीर झालेल्या विविध एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठे यश दाखविण्यात येत आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्मची भविष्यवाणी करणारे नेशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी सर्वच एक्झिट पोल खोटे कसे ठरतील, असा सवाल केला आहे. अब्दुल्ला यांनी या संदर्भात ट्विट केले आहे.
सध्या दाखविण्यात येणारा प्रत्येक एक्झिट पोल खोटा कसा ठरले. टीव्ही बंद करण्याचा आणि सोशल मीडियातून लॉआउट होण्याची वेळ आली आहे. आता फक्त हे पाहायच की, २३ मे रोजी देखील जग तसचं असेल का जस आता आहे, असंही ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक्झिट पोलला जुमलेबाजी म्हटले आहे. तसेच मतचाचण्यांवर आपला विश्वास नाही. या मतचाचण्यांचा वापर केवळ इव्हीएममध्ये गडबड करण्यासाठी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मी सर्व विरोधी पक्षांना एकजूट राहण्याचे आवाहन करते, असंही ममता यांनी म्हटले आहे. काही एक्झिट पोलने पश्चिम बंगालमध्ये भाजपला १५ आणि तृणमूल काँग्रेसला २४ जागा दाखवल्या आहेत. रविवारी आलेल्या बहुतांशी एक्झिट पोलमध्ये भाजपला लोकसभेत स्पष्ट बहुमत दाखविण्यात आले आहे. तर अनेक संस्थांनी भाजपला ३०० हून अधिक जागा दाखवल्या आहेत.