नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीनंतर ही आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. अल्पसंख्यकांचा विश्वास मिळवणे हेच आता लक्ष्य आहे, असे शनिवारी एनडीएच्या पहिल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते . त्यावरून, एमआयएम प्रमुख असदुदीन औवेसी यांनी मोदींचा समाचार घेतला आहे. गोमांसावरून अखलाकला मारणारेच लोक प्रचारसभेमध्ये तुमच्यासमोर बसले होते. असा टोला औवेसी यांनी लगावला आहे.
असदुद्दीन औवेसी म्हटले की, जर पंतप्रधान मोदींना वाटते की, मुस्लीम समाजात भीतीचे वातावरण असून ते घाबरता. तर, गोमांसावरून होणाऱ्या हत्या ते थांबवणारा का ?, असा सवाल औवेसी यांनी उपस्थित केला. तसेच, मुस्लीम समुदायाला गोमांसावरून मारहाण करणाऱ्यांना आणि त्याचा व्हिडिओ बनवणाऱ्यांना अटक करावी, असे आव्हान औवेसींनी केले आहे.
मोदींचे ३०३ खासदार निवडून आले असून त्यात किती मुस्लीम आहेत. भाजप आणि मोदींचे अल्पसंख्याकांचे प्रेम हा दिखाऊपणा असल्याचा आरोप औवेसींनी केला. अल्पसंख्यकांच्या विकासाच्या गोष्टी गेल्या ५ वर्षांपासून फक्त बोलल्या जात आहे. प्रत्यक्षात मात्र, त्यांची कृती अद्याप तशी दिसलेली नाही, असे औवेसी म्हणाले.