मुंबई - नोएडा मतदारसंघाचे भाजप उमेदवार आणि केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांना अडीच कोटींची लाच मागणारी व स्वत:ला पत्रकार म्हणून सांगणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी शर्मा यांच्या कार्यलयात महिलेने स्टींग ऑपरेशनची धमकी देत लाचेची मागणी केली होती. शर्मा यांनी तातडीने पोलिसांना माहितील दिली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांच्या नोएडा येथील कार्यलयात सोमवारी निशू नावाच्या महिलेने पत्रकार असल्याचे सांगत त्यांची भेट घेतली. तुमचा स्टिंग व्हिडिओ माझ्याकडे आहे, त्यासाठी तात्काळ ४५ लाख व उरलेले रक्कम दोन दिवसांनी द्या अशी मागणी केली. शर्मा यांनी महिलेला कार्यलयात बसवून ठेवत याबाबतची माहिती पोलिसांना दिली.
माहिती मिळताच पोलिसांनी शर्मा यांच्या कार्यलयात बसलेल्या महिलेला त्याब्यात घेत चौकशी केली. महिलेकडे छुपा कैमरा व टॅब मिळाला आहे. महिलेकडे मिळाल्या टॅब मध्ये महेश शर्मा यांचे संभाषणाचे व्हिडिओ मिळाला आहे मात्र त्या व्हिडिओ मध्ये पोलिसांना विशेष काही आढळून आले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महिलेसोबत अजून चार ते पाच साथीदार असल्याची माहिती महिलेने पोलिसांना दिली आहे. महिला पत्रकार आपल्या साथीदाराच्या मदतीने राजकीय नेत्यांना ब्लॅकमेल करत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे ताब्यात घेण्यात आलेल्या महिला आणि तिच्या साथीदारांनी याआधी सुद्धा काही नेत्यांना ब्लॅकमेल करून पैसे उकळले आहे.