शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

Lok Sabha Election 2019: दिल्लीत काँग्रेस सातही जागा स्वबळावर लढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 6:26 AM

आम आदमी पक्षाशी आघाडी न करण्याचा काँग्रेसचा निर्णय

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आमचा पक्ष दिल्लीत लोकसभेच्या सर्व सातही जागा स्वबळावर लढवणार असल्याचे व आम आदमी पक्षाशी कोणतीही आघाडी होणार नसल्याचे सांगून सोमवारी सगळ्या चर्चा व अफवांना पूर्णविराम दिला.काँग्रेसच्या दिल्ली प्रदेश अध्यक्ष शीला दीक्षित यांची भूमिका मान्य करून गांधी यांनी स्वत:च्या आणि दिल्ली प्रदेशचे प्रभारी पी. सी. चाको यांच्या सूचनेचा बळी दिला. येथील इंदिरा गांधी इन्डोर स्टेडीयममध्ये ‘मेरा बूथ, मेरा गौरव’ अंतर्गत पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राहुल गांधी म्हणाले की, तुम्ही आपापल्या बूथवर जाऊन लोकांना सांगा की देशाचा विकास काँग्रेसच करू शकतो, आप नाही आणि भाजपादेखील. आता बूथ कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे की, त्यांनी दिल्लीतील सर्व सातही जागांवर काँग्रेस उमेदवारांना विजयी बनवावे.तत्पूर्वी, राहुल यांनी मोदी यांच्यावर टीका करताना पुन्हा म्हटले की, चौकीदार चोर आहे. त्यावर हजारों कार्यकर्त्यांनी ‘चौकीदार चोर है’, असे म्हणत त्यांना प्रतिसाद दिला. कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये जाऊन सांगावे की, मोदी यांनी जे दोन कोटी रोजगाराचे आश्वासन दिले होते ते रोजगार कुठे आहेत? अजहर मसूद याला कोणी सोडले, अजित डोवाल यांची मसूदला सोडण्यात काय भूमिका होती? मोदी यांची खिल्ली उडवताना राहुल गांधी म्हणाले की, मोदी यांचे बूट, शर्टस आणि मोबाईलच्या मागे लिहिलेले असते ‘मेड इन चायना’ आणि ते प्रचार करतात ‘मेक इन इंडिया’चा. राहुल यांनी या संमेलनातून देशाला याचे संकेत द्यायचा प्रयत्न केला की काँग्रेस जे बोलेले ते करील.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Rahul Gandhiराहुल गांधीAam Admi partyआम आदमी पार्टीcongressकाँग्रेसdelhiदिल्ली