Lok Sabha Election 2019 : पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे 'एकला चलो रे'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 14:20 IST2019-03-18T14:18:20+5:302019-03-18T14:20:55+5:30
काँग्रेसची युतीची बोलणी बारगळलेले पश्चिम बंगाल एकमेव राज्य नसून दिल्लीत देखील अशीच स्थिती आहे. दिल्लीतील आम आदमी पक्षासोबतची काँग्रेसची युतीची बोलणी फिसकटली आहे.

Lok Sabha Election 2019 : पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे 'एकला चलो रे'
कोलकाता - आगामी लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्येकाँग्रेसने 'एकला चलो रे' चा नारा दिला आहे. काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने या संदर्भात माहिती दिली. सीपीआयएमसोबतच्या आघाडीची सुरू असलेली चर्चा निष्फळ ठरल्याने काँग्रेस आगामी लोकसभा एकट्याने लढविणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
पश्चिम बंगालमध्ये आघाडी करण्यासाठी आम्ही आमच्या वतीने पूर्ण प्रयत्न केलेत. परंतु, काहीही फायदा झाला नाही. दुसरीकडे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (एम) चे राज्य सचिव सूर्यकांत मिश्रा यांनी म्हटले की, जोपर्यंत काँग्रेसकडून अधिकृत प्रतिक्रिया येत येत नाही, तोपर्यंत आघाडीचा निर्णय होणार नाही.
दरम्यान आम्ही आमचे अस्तित्व आणि विचारांसाठी तडजोड करणार नाही. त्यामुळे आम्ही कुणाला तिकीट द्यावे हे डावे पक्ष आम्हाला सांगू शकत नाहीत, असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेते सोमेन मित्रा यांनी सांगितले. काँग्रेसची युतीची बोलणी बारगळलेले पश्चिम बंगाल एकमेव राज्य नसून दिल्लीत देखील अशीच स्थिती आहे. दिल्लीतील आम आदमी पक्षासोबतची काँग्रेसची आघा़डीची बोलणी फिसकटली आहे.
आघाडीसाठी काँग्रेसने नकार दिल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील सातही जागांवर 'आप'चा विजय होणार असल्याचा दावा केला आहे. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळविण्याच्या मुद्दायावर आमच्या अंतर्गत सर्व्हेनुसार आम आदमी पक्ष काँग्रेसशिवाय सातही जागावर जिंकू, असा दावा 'आप'च्या वतीने करण्यात आला आहे.