23 Apr, 19 07:52 PM
देशभरात तिसऱ्या टप्प्यात उत्साहात मतदान पूर्ण
देशात तिसऱ्या टप्प्यासाठी ओडिशा 58.18 टक्के, त्रिपुरा 78.52 टक्के, उत्तर प्रदेश 57.74 टक्के, पश्चिम बंगाल 79.36 टक्के, छत्तीसगड 65.91 टक्के, महाराष्ट्र 56.17 टक्के मतदान पार पडले
23 Apr, 19 06:23 PM
संध्याकाळी 5.30 पर्यंत तिसऱ्या टप्प्यात 61.31 टक्के मतदान
आसाममध्ये 74.05 टक्के, बिहार 54.95 टक्के, कर्नाटक 60.87 टक्के, केरळ 68.62 टक्के, गुजरात 58.81 टक्के, महाराष्ट्रात 55.05 टक्के, ओडिशा 57.84 टक्के, पश्चिम बंगालमध्ये 78.94 टक्के मतदान पार पडले.
23 Apr, 19 05:29 PM
गिरनार पर्वतावरील एका मतदारासाठी उभारण्यात आलं मतदान केंद्र
गुजरातमधील गिरनार पर्वतावर असणाऱ्या एका मतदारासाठी निवडणूक आयोगाकडून जुनागढ येथे मतदान केंद्र उभारण्यात आलं. मतदार भारतदास बापू यांनी सरकार एका मतदारासाठी इतके पैसे खर्च करुन मतदान केंद्र उभारत असेल तर लोकांनीही घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असं आवाहन केलं.
23 Apr, 19 04:16 PM
तिसऱ्या टप्प्यात देशभरात 3 वाजेपर्यंत 51.15 टक्के मतदान
3 वाजेपर्यंत बिहारमध्ये 46.94 टक्के, गुजरात 50.37 टक्के, महाराष्ट्र 44.80 टक्के, गोवा 58.39 टक्के, आसाम 62.13 टक्के, उत्तर प्रदेश 46.99 टक्के, केरळ 54.91 टक्के, कर्नाटक 49.96 टक्के, पश्चिम बंगालमध्ये 67.52 टक्के मतदान
23 Apr, 19 04:07 PM
काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी केलं मतदान
23 Apr, 19 03:51 PM
मतदानादरम्यान उत्तर कर्नाटकात पावसाचा धुमाकूळ
उत्तर कर्नाटकामध्ये मतदानाच्यावेळी जोरदार पाऊस कोसळत आहे, सिरसी मतदान केंद्राजवळ मुसळधार पाऊस पडत आहे.
23 Apr, 19 03:48 PM
पश्चिम बंगालमध्ये अज्ञात व्यक्तीने मतदान केंद्राजवळ घडवला स्फोट
पश्चिम बंगालमध्ये अज्ञात इसमाकडून मुरशीदाबाद मतदान केंद्राजवळ स्फोट घडवून आणण्यात आला.
23 Apr, 19 03:22 PM
पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस-टीएमसीच्या राड्यात एकाची हत्या
पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि टीएमसी कार्यकर्त्यांच्या राड्यात मतदानासाठी उभ्या असणाऱ्या व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. बलीग्राम-मुशीराबाद मतदारसंघात ही घटना घडली
23 Apr, 19 03:09 PM
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केलं मतदान
माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग यांनी आसाममधील दिसपूर या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
23 Apr, 19 02:37 PM
महबूबा मुफ्ती यांनी मतदान केले
23 Apr, 19 01:57 PM
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अहमदाबादमध्ये मतदान केेले
23 Apr, 19 01:50 PM
पश्चिम बंगालमध्ये दुपारी 1.30 वाजेपर्यंत 52.40 टक्के मतदान
पश्चिम बंगालमध्ये दुपारी 1.30 वाजेपर्यंत 52.40 टक्के मतदान. आसाम, गोव्यामध्ये 46 टक्के तर त्रिपुरामध्ये 45 टक्के मतदान.
23 Apr, 19 01:32 PM
भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केले मतदान
23 Apr, 19 01:30 PM
केरळमध्ये मतदानावेळी केंद्रामध्ये साप दिसला; पकडल्यानंतर मतदानाला सुरुवात
23 Apr, 19 01:14 PM
देशात 1 वाजेपर्यंत 29.69 टक्के मतदान
देशात 117 मतदारसंघांसाठी मतदान सुरु झाले आहे. आतापर्यंत 29.69 टक्के मतदान झाले असून आसाम 46.61 टक्के, दीव दमनमध्ये 41.38 टक्के, पश्चिम बंगालमध्ये 42.21 टक्केमतदान झाले. तर जम्मू काश्मीरमध्ये 4.72 टक्के मतदान झाले आहे.
23 Apr, 19 12:10 PM
चौकीदार हवा असेल तर मी नेपाळला जाईन; भारताला युवक, शेतकऱ्यांसाठी काम करणारा पंतप्रधान हवा आहे: हार्दिक पटेल
23 Apr, 19 12:04 PM
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी बजावला मतदानाचा हक्क
23 Apr, 19 11:38 AM
काँग्रेस नेता हार्दिक पटेल यांनी सुरेंद्रनगर मतदारसंघातून केले मतदान
23 Apr, 19 11:36 AM
दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते मम्मूट्टी आणि मोहनलाल यांनी कोची आणि थिरुवअनंतपुरममध्ये केले मतदान
23 Apr, 19 11:34 AM
देशभरात तिसऱ्या टप्प्यासाठी 23.33 टक्के मतदान
लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी देशभरात सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी 23.33 टक्के मतदान झाले. पश्चिम बंगामध्ये सर्वाधिक 34.72 टक्के तर आसाम, गोव्यामध्ये अनुक्रमे 28.64 आणि 28.02 टक्के मतदान झाले. महाराष्ट्रात 16.46 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
23 Apr, 19 10:18 AM
काँग्रेसचे नेते आणि उमेदवार शशी थरूर यांनी केले मतदान
23 Apr, 19 09:56 AM
जम्मू काश्मीरमध्ये मतदानाला अल्प प्रतिसाद
23 Apr, 19 09:45 AM
देशभरातील मतदानाची पहिल्या दोन तासांतील मतदानाची टक्केवारी आली
23 Apr, 19 09:30 AM
अमित शहा यांनी सपत्नीक मतदान केले
23 Apr, 19 09:29 AM
अपंग, वृद्ध महिलेने बजावला मतदानाचा हक्क
23 Apr, 19 09:14 AM
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी केले मतदान
23 Apr, 19 08:31 AM
मोदींनी मतदानाचा हक्क बजावला
23 Apr, 19 08:26 AM
काँग्रेसचे दक्षिण गोवाचे उमेदवार फ्रान्सिस सारधिना, उत्तर गोव्याचे उमेदवार गिरीष चोडणकर यांनी मतदान केले.
23 Apr, 19 07:50 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदी मतदानकेंद्रावर हजर
23 Apr, 19 07:58 AM
केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांनी रांगेत उभे राहून बजावला मतदानाचा हक्क्
23 Apr, 19 07:35 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये आईला भेटायला गेले.
23 Apr, 19 07:51 AM
कर्नाटकातील शिकारीपुरा मतदारसंघातील भाजपा उमेदवार बी वाय रघुवेंद्र यांनी केले मतदान
23 Apr, 19 07:47 AM
भाजप अध्यक्ष अमित शहा मतदान केंद्रावर उपस्थित
23 Apr, 19 07:35 AM
कर्नाटकातील नेत्यांचे देवदर्शन; मतदानाला सुरुवात
23 Apr, 19 07:30 AM
सैफईमध्ये मतदानाला सुरुवात