06 May, 19 06:11 PM
हावडाचे खासदार प्रसून बॅनर्जी आणि मतदान केंद्रावरील सुरक्षा रक्षकांमध्ये बाचबाची
06 May, 19 06:11 PM
सायंकाळी 6 वाजेपर्यंत 59.38 टक्के मतदान
06 May, 19 05:13 PM
सायंकाळी 5 वाजेपर्यंत 53.81 टक्के मतदान
06 May, 19 05:08 PM
शोपियानमध्ये मतदान केंद्रावर पेट्रोल बॉम्ब फेकला; नुकसान नाही
06 May, 19 04:34 PM
मध्य प्रदेशमध्ये 7 जागांसाठी दुपारी 4 वाजेपर्यंत 53.84 टक्के मतदान
06 May, 19 04:31 PM
दुपारी 4 वाजेपर्यंत 50.60 टक्के मतदान, पश्चिम बंगाल पुन्हा अव्वल
06 May, 19 03:14 PM
दुपारी 3 वाजेपर्यंत 46.44 टक्के मतदान
दुपारी 3 वाजेपर्यंत बिहारमध्ये 42.51 टक्के, जम्मू काश्मीर 12.86 टक्के, मध्य प्रदेश 46.88 टक्के, राजस्थान 47.31 टक्के, उत्तर प्रदेश 41.36 टक्के, पश्चिम बंगाल 58.13 टक्के तर झारखंड येथे 50 टक्के मतदान पार पडले.
06 May, 19 02:35 PM
क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीने रांची येथे केलं मतदान
क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी याने झारखंडमधील रांची येथील जवाहर विद्या मंदीर मतदान केंद्रामध्ये मतदानाचा हक्क बजावला
06 May, 19 12:31 PM
दुपारी 1 वाजेपर्यत 32.33 टक्के मतदान, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 40.79 टक्के मतदान
दुपारी 1 पर्यंत बिहारमध्ये 25.79 टक्के, जम्मू काश्मीर - 6.54 टक्के, मध्य प्रदेश - 32.31 टक्के, राजस्थान 34.52 टक्के, उत्तर प्रदेश - 27.55 टक्के, पश्चिम बंगाल 40.79 टक्के तर झारखंडमध्ये 37.96 टक्के मतदान पार पडले.
06 May, 19 12:31 PM
अभिनेता आशुतोष राणा यांनी केलं मतदान
मध्य प्रदेशातील नरसिंगपूर येथे अभिनेता आशुतोष राणा यांनी मतदानाचा हक्क बजावला.
06 May, 19 11:32 AM
वडिलांच्या अंत्यविधीनंतर मुलाने बजावला मतदानाचा हक्क
मध्य प्रदेशमधील छतरपूर येथे वडिलांचा अत्यंविधी केल्यानंतर मुलाने मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला.
06 May, 19 10:46 AM
51 मतदारसंघासाठी सकाळी 10 पर्यंत 12.65 टक्के मतदान
सकाळी 10 वाजेपर्यत बिहारमध्ये 11.51 टक्के, जम्मू काश्मीर - 1.36 टक्के, मध्य प्रदेश - 13.18 टक्के, राजस्थान - 14 टक्के, उत्तर प्रदेश - 9.85 टक्के, पश्चिम बंगाल- 16.56 टक्के तर झारखंडमध्ये 13.46 टक्के मतदान पार पडले.
06 May, 19 10:25 AM
बिहारमध्ये छपरा येथे ईव्हीएम मशीनची तोडफोड
बिहारच्या छपरा मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनची तोडल्याप्रकरणी रणजीत पासवान यांना अटक
06 May, 19 10:22 AM
काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मतदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न - स्मृती ईराणी
अमेठी मतदारसंघात बळजबरीने राहुल गांधी यांच्या कार्यकर्त्यांकडून मतदान केंदावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भाजपा उमेदवार स्मृती ईराणी यांनी केला आहे.
06 May, 19 10:07 AM
सपा-बसपा आघाडीचं आव्हान भाजपासाठी नाही - राजनाथ सिंह
सपा-बसपा महागठबंधनचे आव्हान भाजपासाठी नाही, त्यामुळे त्यांच्या उमेदवाराबद्दल मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. मुद्द्यावर ही निवडणूक जिंकली जाईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री आणि लखनऊचे भाजपा उमेदवार राजनाथ सिंह यांनी सांगितले.
06 May, 19 09:53 AM
बिहारच्या हाजीपूर मतदान केंद्रावर लोकांनी मतदानासाठी केली गर्दी
06 May, 19 09:51 AM
वृद्ध आईला खांद्यावर घेऊन मुलगा मतदानासाठी केंद्रावर पोहचला
झारखंड येथे हजारीबाग मतदान केंद्रावर 105 वर्षीय आईला खांद्यावर घेऊन मुलगा मतदान करण्यासाठी केंद्रावर पोहचला.
06 May, 19 09:47 AM
केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांनी मतदानाचा हक्क बजावला.
झारखंडमध्ये केंद्रीय मंत्री आणि हजीराबाद लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार जयंत सिन्हा यांनी मतदानाचा हक्क बजावला.
06 May, 19 09:13 AM
पुलवामा येथे ग्रेनेड हल्ला, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
जम्मू काश्मीरच्या अनंतनाग लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान पार पडत आहे. मात्र पुलवामा येथे मतदान केंद्राजवळ ग्रेनेड हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं सांगण्यात येतंय.
06 May, 19 08:54 AM
पश्चिम बंगालमध्ये टीएमसीच्या कार्यकर्त्यांवर भाजपाने केला गुंडगिरीचा आरोप
पश्चिम बंगालमध्ये भाजपा उमेदवार अर्जुन सिंग यांनी टीएमसीच्या कार्यकर्त्यांवर गुंडगिरीचा आरोप केला. टीएमसीच्या गुंडांनी मला मारहाण केली असून आमच्या मतदारांनाही मतदान करण्यापासून रोखलं जात आहे असा आरोप भाजपाने केला आहे.
06 May, 19 08:37 AM
जम्मू काश्मीरच्या ख्रू येथील मतदान केंद्रावर लोकांची गर्दी
जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामधील ख्रू या मतदान केंद्रावर लोकांनी मतदानासाठी गर्दी केली आहे. अनंतनाग लोकसभा मतदारसंघासाठी पाचव्या टप्प्यात मतदान पार पडत आहे.
06 May, 19 08:24 AM
बसपा प्रमुख मायावती यांनी मतदानाचा हक्क बजावला.
बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी लखनऊमधील सिटी मोन्टेसरी इंटर कॉलेजच्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
06 May, 19 08:13 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदानासाठी लोकांना केलं आवाहन
देशातील पाचव्या टप्प्प्यातील मतदानासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावं, देशाच्या भवितव्यासाठी आणि सृदृढ लोकशाहीसाठी मतदानाचा हक्क बजावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना केलं आहे.
06 May, 19 07:59 AM
पुलवामा येथे मतदानासाठी लोकांच्या रांगा
जम्मू काश्मीर येथील अनंतनाग लोकसभा मतदारसंघातील पुलवामा येथेही लोकांचा मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्या आहेत.
06 May, 19 07:46 AM
भाजपाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी बजावला मतदानाचा हक्क
केंद्रीय गृहमंत्री आणि लखनऊ लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार राजनाथ सिंह यांनी मतदानाचा हक्क बजावला.
06 May, 19 07:26 AM
केंद्रीय मंत्री राजवर्धन राठोड हे पत्नीसह मतदानाचा हक्क बजावणार
राजस्थान येथे केंद्रीय मंत्री राजवर्धन राठोड आणि त्यांच्या पत्नी गायत्री राठोड जयपूर येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी पोहचले
06 May, 19 07:24 AM
ज्येष्ठ नागरीकही उत्स्फुर्तपणे मतदान करण्यासाठी उपस्थित
बिहारमधील सारण येथे व्हीलचेअरवरुन ज्येष्ठ नागरीक मतदान करण्यासाठी केंद्रावर पोहचले
06 May, 19 07:15 AM
माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा आणि त्यांच्या पत्नी निलिमा सिन्हा मतदानासाठी रांगेत उभे
झारखंड येथील हजीराबाग येथे माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा आणि त्यांच्या पत्नी निलिमा सिन्हा मतदानासाठी सकाळी मतदान केंद्रावर पोहचले.
06 May, 19 07:11 AM
देशातील 7 राज्यातील 51 मतदारसंघामध्ये मतदानाला सुरुवात
06 May, 19 06:57 AM
देशात पाचव्या टप्प्यासाठी काही मिनिटांत होणार मतदानाला सुरुवात