लखनौ - बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी भारतीय जनता पक्षाच्या 'मै भी चौकीदार' या मोहिमेवर खोचक टीका केली आहे. मायावती यांनी मंगळवारी ट्विट करून म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४ च्या निवडणुकीत चहावाले होते. आता ते चौकीदार बनले आहेत. भाजप सरकारमध्ये कमालीचा बदल झाल्याचा टोला मायावती यांनी लगावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर हँडलचे नाव बदलले असून चौकीदार नरेंद्र मोदी असे केले आहे. त्यावर विरोधकांकडून टीका होत आहे. मायावती यांच्यापूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी आधीच भाजपच्या चौकीदार मोहिमेची खिल्ली उडवली आहे. राहुल गांधी म्हणाले होते की, मोदी पकडल्यानंतर संपूर्ण देशाला चौकीदार करण्याच्या तयारीत आहेत. तर चौकीदारची गरज श्रीमंतांना असते, गरिबांनी नव्हे, असा टोला प्रियंका गांधी यांनी लगावला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मै भी चौकीदार' मोहिमेची सुरुवात केल्यानंतर भाजपमधील अनेक नेत्यांनी आपल्या ट्विटर हॅँडलवर नावापूर्वी चौकीदार लिहिले आहे. परंतु यावर विरोधाकांकडून टीका होत आहे.