नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील सहाव्या टप्प्यातील मतदान १२ मे रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील सत्ताधारी आणि विरोधकांमधील शाब्दीक चकमक वाढली आहे. त्यातच आता जातीचे राजकारण तापल्याचे दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या जातीचा मुद्दा छेडल्यानंतर विरोधकांनी देखील त्यांच्या वक्तव्याला चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.
राजकीय स्वार्थासाठी पंतप्रधान मोदी मागास जातीचे झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जन्मत: मागास किंवा ओबीसी असते तर आसएसएसने त्यांना पंतप्रधान केलं नसतं, असही मायावती यांनी म्हटले. मायावती यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करून मोदींवर निशान साधला आहे.
मायावती यांनी पहिल्या ट्विटमध्ये म्हटले की, महायुती जातीवादी असल्याचे आरोप पंतप्रधान मोदी करत आहेत. हे आरोप अत्यंत हस्यास्पद असून अपरिपक्वकेचे आहेत. जातीवादाच्या शापाने पिडीत असलेले लोक जातीवाद कसकाय करू शकतात. मोदी जन्मता ओबीसी नसल्यामुळे त्यांना जातीवादाची झळ बसलेली नाही. त्यामुळे अशा खोट्या गोष्टी मोदी बोलत असल्याचे मायावती यांनी नमूद केले.
राजकीय फायद्यासाठी मोदी स्वत:ला मागास जातीचे सांगतात. याचा उल्लेख करून मोदी जातीवादाचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मोदी जन्मत: मागास असते तर त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पंतप्रधान होऊच दिले नसते, असा दावा मायावती यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये केला. तसेच कल्याण सिंह यांच्या सारख्या नेत्याला आरएसएसने केवळ मागास जातीचे असल्यामुळे डावलल्याचा आरोपही मायावती यांनी केला.