देशात 'मोदी कोड ऑफ कंडक्ट'; काँग्रेसचा निवडणूक आयोगाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 02:49 PM2019-04-28T14:49:05+5:302019-04-28T14:49:20+5:30

आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी नरेंद्र मोदी आणि शाह यांच्यावर कारवाई न झाल्यास आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. तसेच निवडणूक आयोगाचे मौन म्हणजे भाजपसाठी मूक संमिती समजायची का, असा सवाल काँग्रेसनेते मनू सिंघवी यांनी उपस्थित केला आहे.

Lok Sabha Election 2019 Modi Code of Conduct' in the country says Congress | देशात 'मोदी कोड ऑफ कंडक्ट'; काँग्रेसचा निवडणूक आयोगाला टोला

देशात 'मोदी कोड ऑफ कंडक्ट'; काँग्रेसचा निवडणूक आयोगाला टोला

googlenewsNext

नवी दिल्ली - काँग्रेसच्या वतीने शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याकडून होणाऱ्या आचारसंहिता भंगावर निवडणूक आयोगाच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. तसेच देशात सध्या 'मोदी कोड ऑफ कंडक्ट' असल्याचा खोचक टोला काँग्रेसकडून लगावण्यात आला आहे.

आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी नरेंद्र मोदी आणि शाह यांच्यावर कारवाई न झाल्यास आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. तसेच निवडणूक आयोगाचे मौन म्हणजे भाजपसाठी मूक संमिती समजायची का, असा सवाल काँग्रेसनेते मनू सिंघवी यांनी उपस्थित केला आहे.

दुसरीकडे बॅलेट पेपरवरील कमळाच्या चिन्हाखाली भाजप असं लिहिण्यात आल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. यावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. तसेच हे नाव हटविण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. या संदर्भात विरोधकांच्या एका गटाने निवडणूक आयोगाचे सुनील अरोरा यांच्याकडे तक्रार केली. तसेच चिन्हाखाली असलेले भाजपचे नाव हटवा अन्यथा इतर पक्षांच्या चिन्हाखाली देखील त्या पक्षांचे नाव लिहा, अशी मागणी केली आहे.

दरम्यान निवडणूक आयोगाने विरोधी पक्षांचा दावा चुकीचे असल्याचे म्हटले आहे. २०१३ मध्ये भाजपकडून चिन्हाच्या खाली पक्षाचे नाव टाकण्याची मागणी करण्यात आली होती. केवळ चिन्हावरून भाजप समजणे कठिण जाते, असंही त्यावेळी भाजपकडून सांगण्यात आले होते, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यानंतर कमळाच्या चिन्हाखाली भाजप लिहिण्यात आले होते. यामध्ये कमळाच्या खाली असलेले पाणी देखील यात सामील होते. तसेच हे चिन्ह २०१४ पासून वापरण्यात येत असल्याचे समजते.

दरम्यान ईव्हीएमवर देखील भाजपच्या निशानीखाली पक्षाचे नाव लिहिलेले दिसत आहे. कोणताही पक्ष निवडणुकीचे चिन्ह आणि पक्षाचं नाव लिहू शकत नाही, असे काँग्रेस नेते मनू सिंघवी यांनी म्हटले आहे. तर तृणमूल काँग्रेसने बॅलेट पेपरवर भाजपच्या असलेल्या नावावर आक्षेप नोंदविला आहे. तरी देखील बॅलेट पेपरमध्ये बदल करण्यात येणार नाही, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

 

Web Title: Lok Sabha Election 2019 Modi Code of Conduct' in the country says Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.