… ही तर मोदींसाठी धोक्याची घंटा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 11:13 AM2019-04-12T11:13:12+5:302019-04-12T11:17:44+5:30

२०१४ साली असलेली मोदी लाट २०१९ मध्ये नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. परंतु, भाजपकडून करण्यात आलेली प्रचंड जाहिरातबाजी, नमो टीव्ही, सैन्याने केलेल्या शौर्याचे घेण्यात येत असलेले श्रेय यामुळे सध्या भाजपचीच चर्चा आहे.

Lok Sabha Election 2019 Modi in danger zone | … ही तर मोदींसाठी धोक्याची घंटा

… ही तर मोदींसाठी धोक्याची घंटा

Next

मुंबई - यंदाची लोकसभा निवडणूककाँग्रेस पक्षासाठी आव्हानात्मक आहे. २०१४ मध्ये काँग्रेसला लाजिरवाण्या पराभवाला समोरे जावे लागले होते. त्यातून सावरण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसकडून गेल्या निवडणुकीप्रमाणेच सोनिया गांधी यांच्यासह राहुल गांधी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यावेळी मात्र राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. तर युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसचा गड असलेल्या रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या सोनिया यांनी भाजपसह मोदींना निर्वाणीचा इशारा देताना २००४ विसरू नये, असा टोला लगावला आहे. त्यामुळे मोदींसाठी ही धोक्याची घंटा तर नव्हे ना, असा प्रश्न राजकीय विश्लेषकांना पडला आहे.

२०१४ साली असलेली मोदी लाट २०१९ मध्ये नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. परंतु, भाजपकडून करण्यात आलेली प्रचंड जाहिरातबाजी, नमो टीव्ही, सैन्याने केलेल्या शौर्याचे घेण्यात येत असलेले श्रेय यामुळे सध्या भाजपचीच चर्चा आहे. तसेच २०१४ पेक्षा मोठा विजय भाजप यावेळी मिळणावर असा दावा भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. वास्तविक पाहता गेल्या वर्षीच्या तुलनेत आता मोठे बदल झालेले आहेत. त्यामुळे मोदींसाठी २०१९ चा मार्ग खडतरच समजला जात आहे.

१९९९ मध्ये देशात एनडीएचे सरकार स्थापन झाले होते. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. अटलजी यांच्या कार्यकाळातच पाकिस्तानसोबत कारगील युद्ध झाले होते. तसेच अटलजी यांनी अनुचाचणी देखील घेतली होती. त्यामुळे अटलजी आणि भाजपची लोकप्रियता वाढली होती. भाजपच्या राष्ट्रवादामुळे देशात अटलजी पुन्हा एकदा सरकार स्थापन करतील, अशी अंदाज अनेकांनी त्यावेळी केले होते. अटलजींचे समर्थन करणाऱ्यांची संख्या मोठी होती. ज्याप्रमाणे मोदींची सध्या लोकप्रियता आहे, अगदी त्याचप्रमाणे अटलजी लोकप्रिय होते.

पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळातील अखेरच्या टप्प्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध बिघडले. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यांने पाकिस्तानला धडा शिकवला. त्यामुळे देशात राष्ट्रवादाची लहर आली आहे. याचा लाभ घेण्याचा भाजपकडून प्रयत्न करण्यात येत असून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्याच्या बलिदानावर जनतेला मतं मागण्यास सुरुवात केली आहे. अटलजींच्या काळातही राष्ट्रवादाची लाट होती. परंतु, अटलजींनी सैन्याच्या नावावर मत मागितले नव्हते. तसेच अटलजींची लोकप्रियता पाहता भाजप विजयी होईल, असा अंदाज होता. मात्र २००४ मध्ये काँग्रेसने जबरदस्त 'कमबॅक' करताना एनडीए सरकारला सत्तेवरून खाली खेचले होते.

याच पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदींना इतिहासाची आठवण करून दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पंतप्रधान मोदींनी २००४ विसरू नये, असं सांगत सोनिया यांनी २०१९ मध्ये काँग्रेसच्या विजयाचा विश्वास व्यक्त केली आहे. यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या असून ही मोदींसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019 Modi in danger zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.