काँग्रेसचे २० आमदार नाराज, कधीही निर्णय घेऊ शकतात; येडियुरप्पांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 02:24 PM2019-05-10T14:24:43+5:302019-05-10T14:25:01+5:30

काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करणार आहे. मात्र ही शक्यता काँग्रेस नेते आणि उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी फेटाळली आहे.

Lok Sabha Election 2019 more than 20 congress mla might take any decision at any time says yeddyurappa | काँग्रेसचे २० आमदार नाराज, कधीही निर्णय घेऊ शकतात; येडियुरप्पांचा दावा

काँग्रेसचे २० आमदार नाराज, कधीही निर्णय घेऊ शकतात; येडियुरप्पांचा दावा

Next

बंगळुरू - गेल्या अनेक दिवसांपासून कर्नाटक राज्यातील राजकीय हालचाली थंडावल्या आहेत. आता पुन्हा एकदा येथील राजकीय घडामोडींनी वेग येण्याची शक्यता आहे. तसा इशारा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपनेते बी.एस. येडियुरप्पा यांनी दिला आहे. काँग्रेसचे २० आमदार कधीही निर्णय घेऊ शकतात, असा दावा त्यांनी केला आहे.

राज्यातील काँग्रेसचे २० आमदार विद्यमान सरकारवर नाराज आहेत. त्यामुळे हे आमदार कोणत्याही क्षणी निर्णय घेऊ शकतात. काही दिवसांपूर्वी देखील अशीच चर्चा रंगली होती की, काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करणार आहे. मात्र ही शक्यता काँग्रेस नेते आणि उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी फेटाळली आहे. कुणीही निवडणुकीच्या तयारी लागले नसून आम्ही पाच वर्षे सरकार चालविण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.



 

कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर युतीचे सरकार आहे. मात्र भाजपकडून आमदार खरेदी करण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आल्याचे आरोप काँग्रेस आणि जेडीएसकडून करण्यात आले आहे. त्यात आता येडियुरप्पा यांच्या वक्तव्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. वर्तमान सरकारमधील २० आमदार नाराज असून ते कधीही पक्षांतर करू शकतात. त्यामुळे वेट अन्ड वॉच असही युडियुरप्पा यांनी म्हटले आहे.

सिद्धररमया यांनी देखील मुख्यमंत्री बदलाची शक्यता फेटाळली आहे. सध्या तरी कोणते परिवर्तन होण्याचे संकेत नाहीत. परिवर्तन का होणार, असा सवाल करताना कुमारस्वामी मुख्यमंत्रीपदी विराजमान असून मुख्यमंत्र्यांची खुर्ची रिकामी नसल्याचे सिद्धरमया यांनी म्हटले आहे.

 

Web Title: Lok Sabha Election 2019 more than 20 congress mla might take any decision at any time says yeddyurappa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.