नवी दिल्ली - लोकशाहीच्या महापर्वातील पहिल्या अध्यायाला आज सुरुवात झाली आहे. त्यामुळे, मतदारांनी अपना टाईम आ गया असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, देशाच्या संसदेत आपला लोकप्रतिनिधी पाठविण्यासाठी सर्वसामान्य नागरिक आज मतदानाचा हक्क बजावत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. खासकरुन तरुण आणि पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांना मोठ्या संख्येने घराबाहेर पडा अशी विनंती त्यांनी केली आहे.
'लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. लोकशाहीच्या या उत्सवात नक्की सहभागी व्हा अशी माझी सर्वांना विनंती आहे. जास्तीत जास्त संख्येने मतदान करा. खासकरुन तरुण आणि पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडा. पहले मतदान फिर जलपान' असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
17 व्या लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी देशाच्या विविध राज्यातील 91 मतदारसंघात आज मतदान होत आहे. या मतदानला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. राज्यात विदर्भातील 7 मतदारसंघात आज मतदान होत आहे. त्यामध्ये, नागपूर, रामटेक, गोंदिया-भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम, गडचिरोली-चिमूर या सात मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे. नागरिकांमध्ये निवडणुकांचा उत्साह दिसत असून मतदान केंद्रावर रांगा लागत आहेत.
Lok Sabha Election Voting: गुगलकडून डुडलद्वारे लोकशाहीचा सन्मान, भारतीयांना मतदान करण्याचं आवाहनगुगलनेही डुडलद्वारे भारतीयांना मतदान करण्याचे आवाहन केलं आहे. देशातील लोकशाहीच्या महापर्वाची दखल गुगल या जगप्रसिद्ध सर्ज इंजिनने घेतली आहे. गुगलने डुडलद्वारे मतदान करण्याचे आणि मतदान करण्याची प्रकिया समजावून सांगितली आहे. गुगलच्या इंग्रजी अक्षरातील तिसऱ्या क्रमांकाचे O (ओ) हे अक्षर गुगलने मतदानरुपी दर्शवले आहे. त्यामध्ये, डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावल्याचे दिसत आहे.
सर्वांनी मतदान करायला हवं, राष्ट्राची सुरक्षा आणि एकात्मतेसाठी मतदान करायला हवं. निवडणूक आयोगही म्हणतं, आम्हीही तेच म्हणत असल्याचं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. स्वर्गीय भाऊजी दफ्तर उच्च प्राथमिक शाळेच्या संघ बिल्डिंगमागील मतदान केंद्रात भागवत यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. भागवत हे सकाळी लवकरच मतदान केंद्रावर पोहोचले होते. सरसंघचालक मोहन भागवत यांनी सर्वप्रथम मतदान केले आहे. त्यासाठी सकाळी-सकाळीच ते मतदान केंद्रावर हजर झाले होते. येथील मतदान केंद्रावर मतदानाचा पहिला हक्कही त्यांनीच बजावला. मतदानासाठी पहिला माझा नंबर हेच त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे. विशेष म्हणजे, मतदान केल्यानंतर मीडियाशी संवाद साधताना प्रत्येकाने मतदान करायला हवं, मतदान कराच असा संदेशही भागवत यांनी देशातील नागरिकांना दिला आहे. राष्ट्राची सुरक्षा आणि एकात्मतेसाठी सर्वांनी मतदान करायलाच हवं. निवडणूक आयोगही सांगतं, आम्हीही तेच म्हणत असल्याचं भागवत यांनी म्हटलं आहे.