शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

डोन्ट कॉल मी राहुल! काँग्रेस अध्यक्षांसारखा दिसू नये म्हणून मोदी समर्थकाचा मेकओव्हर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 11:00 AM

20 किलो वजन वाढवलं; दाढी ठेवण्यास सुरुवात

सूरत: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसारखं दिसू नये यासाठी भाजपा समर्थकानं वजन वाढवलं आहे. याशिवाय हेअर स्टाइलदेखील बदलली आहे. गुजरातच्या सूरतमध्ये राहणारे प्रशांत सेठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसारखे दिसायचे. मात्र ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळेच कोणी राहुल गांधींच्या नावानं हाक मारू नये, यासाठी सेठींनी 20 किलो वजन वाढवून 'मेकओव्हर' केला आहे. प्रशांत सेठी काही महिन्यांपूर्वी अगदी राहुल गांधींसारखे दिसायचे. 2014 च्या निवडणुकीवेळी तर त्यांना पाहायला मोठी गर्दी जमायची. प्रशांत दुकानात गेल्यावर अनेक जण गोळा व्हायचे. मात्र त्यानंतर प्रशांत यांनी स्वत:चा लूक बदलला. त्यामुळे पाच वर्षांपूर्वीचे प्रशांत आणि आताचे प्रशांत यांच्यात मोठा फरक आहे. राहुल गांधीसारखं दिसत असल्यानं त्रास झाल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळेच प्रशांत यांनी लूक बदण्याकडे कटाक्षानं दिलं आणि 20 किलोनं वजन वाढवलं. याशिवाय क्लिन शेव्ह करण्याऐवजी दाढी वाढवण्यास सुरुवात केली. प्रशांत सेठी यांना पंतप्रधान मोदींवरील चित्रपटात राहुल गांधींची भूमिका साकारण्याची ऑफर होती, असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. मात्र सेठी यांनी भूमिकेला नकार दिला. 'राहुल गांधी राष्ट्रीय नेते आहेत आणि मी त्यांचा आदर करतो. पण मी नरेंद्र मोदींचा समर्थक आहे. त्यामुळेच मी बॉलिवूडच्या चित्रपटात राहुल गांधी साकारण्यास नकार दिला,' असं सेठींनी सांगितलं. एक नागरिक म्हणून मला राहुल गांधींकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र पाच वर्षांत त्यांना कोणतीही मोठी कामगिरी करता आली नाही, असंदेखील ते पुढे म्हणाले.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस