अमेठी - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सोमवारी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात राहुल अमेठी, आणि रायबरेली मतदार संघात प्रचार केला. मात्र या कार्यक्रमात राहुल यांच्या कार्यक्रमात एक बदल करण्यात आला. राहुल यांच्या काकू मनेका गांधी यांच्या सुलतानपूर मतदार संघातील सभेसंदर्भात बदल करण्यात आला.
राहुल गांधी सुलतानपूरमध्ये एक प्रचार सभा घेणार होते. मात्र त्यांच्या कार्यक्रमातील सभा रद्द करून सुलतानपूरमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात घेतल्याचे समजते. बैठकीत त्यांनी उपस्थितांकडून चौकीदार चौर है च्या घोषणा देखील वदवून घेतल्या. मात्र सभा न घेतल्यामुळे राहुल काकूंच्या मतदार संघात प्रचार करणे टाळतायत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सुलतापूरमधून काँग्रेसकडून संजय सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संजय सिंह यांच्यासाठी राहुल गांधी प्रचार सभा घेणार होते. मात्र अंतिम समयी कार्यक्रमात बदल करण्यात आला.
याआधी देखील अनेकदा गांधी कुटुंबियांकडून एकमेकांविरुद्ध प्रचार करणे टाळण्यात आले आहे. परंतु, काही दिवसांपूर्वीच मनेका गांधी यांनी स्पष्ट केले होते की, पक्षाने त्यांना स्मृती इराणी यांच्यासाठी अमेठीत प्रचार करण्याच्या सूचना केल्या तर त्या आवश्य अमेठीत जातील. परंतु, अजुन तरी त्यांनी इराणी यांच्यासाठी अमेठीत प्रचार केला नाही.
सुलतानपूर मतदार संघातून याआधी वरुण गांधी खासदार होते. मात्र यावेळी भाजपकडून वरुण आणि मनेका यांच्या मतदार संघांची आदलाबदली करण्यात आली आहे. त्यामुळे सुलतापूरमधून मनेका गांधी तर पिलीभीतमधून वरुण गांधी लोकसभेच्या मैदानात आहेत. पिलीभीतमध्ये तिसऱ्या टप्प्यात मतदान होत असून सुलतानपूरमध्ये पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे.