'स्मृती इराणी अमेठीची काळजी घ्या' : राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 08:57 PM2019-05-23T20:57:01+5:302019-05-23T21:01:56+5:30
गांधी कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या अमेठी लोकसभा मतदार संघातून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधीना पराभव स्वीकारावा लागला.
नवी दिल्ली - देशाचे लक्ष लागून असलेल्या अमेठी लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाच्या नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना विजयी झाल्या आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठी लोकसभा मतदारसंघामध्येही काँग्रेसला इतिहासामध्ये प्रथमच पराभव स्वीकारावा लागला आहे. यावर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया आणि स्मृती इराणी यांना विजयासाठी शुभेच्छा देताना, अमेठी लोकसभा मतदारसंघाची काळजी घ्या अशी भावनिक साद घातली.
गांधी कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या अमेठी लोकसभा मतदार संघातून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधीना पराभव स्वीकारावा लागला. राहुल गांधीच्या पराभवासाठी भाजपने सपूर्ण ताकद पणाला लावली होती. त्यामुळे भाजप आणि कॉंग्रेस दोघांसाठी हे मतदारसंघ महत्वाचे होते. मात्र , आलेल्या निकालानुसार राहुल गांधींना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यानंतर त्यांनी भाजपच्या स्मृती इराणी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
राहुल यांनी मतमोजणी बाकी असतानाच स्मृती इराणी यांना विजयासाठी शुभेच्छा देताना अमेठी लोकसभा मतदारसंघाची काळजी घ्या अशी भावनिक साद घातली. जनताच मालक असून जनतेने आपला निर्णय दिला आहे, असे राहुल म्हणाले. २००४ पासून राहुल गांधी येथून विजय मिळवत आले आहे.