जयपूर - २०१४ लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारात आग्रस्थानी असलेले रामदेव बाबा यांनी स्वत:ला नरेंद्र मोदी सरकारपासून वेगळे ठेवले होते. लोकसभा निवडणुकीचा धुराळा उडत असताना भाजकडून रामदेव बाबा कुठेही दिसत नव्हते. परंतु, पहिल्या दोन टप्प्यानंतर रामदेव बाबा पुन्हा भाजपच्या निवडणूक प्रचारासाठी परतले आहे. केंद्रीयमंत्री राजवर्धन राठोड यांनी जयपूर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी रामदेव बाबा उपस्थित होते. त्यांनी मोदींना मतदान देण्याचे आवाहन केले.
२०१९ मध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना आशिर्वाद द्यावा लागणार आहे. त्यांच्याच हातात देश सुरक्षित आहे. त्यांच्या हातात जवानांचे भविष्य सुरक्षित आहे. शेतकऱ्यांची शेती, शिक्षण, आरोग्य व्यवस्था, महिलांची आब्रु सुरक्षित आहे. एवढच नाही, तर देशातील अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी मोदींनी घेतली असल्याचे रामदेव बाबा यांनी म्हटले.
लोकसभा निवडणुकीत एखाद्या व्यक्तीची गोष्ट नसून व्यक्तीमत्वाची आहे. आपण कायम व्यक्तीमत्वाची उपासना केली आहे. चित्राची नव्हे तर चरित्राची उपासना केल्याचे सांगत रामदेव बाबांनी मोदींची प्रशंसा केली आहे. तत्पूर्वी रामदेव बाबा यांनी भाजपपासून सुरक्षीत अतंर ठेवल्याचे वृत्त आले होते. मात्र या सर्व चर्चांना पूर्णविराम देत रामदेव बाबा भाजपसाठी पुन्हा एकदा प्रचाराच्या रणधुमाळीत उतरल्याचे चित्र आहे.
यावेळी राज्यवर्धन राठोड यांनी म्हटले की, २०१९ लोकसभा निवडणूक मागील ५ वर्षात केलेल्या कामांची आणि याआधी ५० वर्षांत केलेल्या कामाची लढाई आहे. या मतदार संघात ६ मे रोजी मतदान होणार आहे.