राजस्थानात 'मोदीजी से बैर नही, वसुंधरा की खैर नही' नाऱ्याचा इफेक्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 09:45 PM2019-05-23T21:45:35+5:302019-05-23T21:45:49+5:30
राजस्थानमध्ये गेल्या वर्षी विधानसभा निवडणुका झाल्या. त्यावेळी एक नारा चांगलाच गाजला होता. 'मोदीजी से बैर नही, वसुंधरा की खैर नही' या नाऱ्यातून तत्कालीन मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याविषयीचा राग व्यक्त करण्यात येत होता.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून यामध्ये भाजपप्रणीत एनडीएने शानदार विजयाची नोंद केली. एकट्या भाजपनेच बहुमतापेक्षा अधिक जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला. यामध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने जबरदस्त कमबॅक केले आहे. त्यामुळे विधानसभेच्या वेळी देण्यात आलेला 'मोदीजी से बैर नही, वसुंधरा की खैर नही' चर्चेत आला आहे.
राजस्थानमध्ये गेल्या वर्षी विधानसभा निवडणुका झाल्या. त्यावेळी एक नारा चांगलाच गाजला होता. 'मोदीजी से बैर नही, वसुंधरा की खैर नही' या नाऱ्यातून तत्कालीन मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याविषयीचा राग व्यक्त करण्यात येत होता. त्यानुसार राजस्थानातील जनतेने वसुंधरा सरकार पाडले. परंतु, त्या नाऱ्याचा इफेक्ट आतापर्यंत कायम होता, हे लोकसभा निवडणुकीतून समोर आले आहे.
मध्य प्रदेशातील जनतेची नाराजी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध नव्हती तर वसुंधरा राजेंविरुद्ध होती, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येथील जनतेने राज्यात जरी काँग्रेसला निवडून दिले असले तरी लोकसभेला नरेंद्र मोदी यांचीच निवड केली आहे. यावेळी येथील जनता मोदींच्या समर्थनात समोर आली. त्यातच पाकिस्तानवर केलेली एअर स्ट्राईक देखील मोदींसाठी जमेची बाजू ठरली आहे. मात्र एका नाऱ्याचा इफेक्ट चार-पाच महिने राहू शकतो, हे मोदींच्या राजस्थानातील विजयामुळे अधोरेखीत झाले, असंच म्हणावे लागले.