नवी दिल्ली : क्रिकेटच्या मैदानावर प्रतिस्पर्धी गोलंदाजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या गौतम गंभीरने राजकारणाच्या मैदानावरही दमदार बॅटिंग केली. भाजपाच्या तिकिटावर पूर्व दिल्लीतून उभ्या राहिलेल्या गंभीरने 12.30 वाजेपर्यंत 1 लाख 36 हजार 914 मतांसह जवळपास 70 हजार मतांनी आघाडी घेतली आहे.
2011च्या वर्ल्ड कप विजयात गंभीरची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. 15 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत त्यानं अनेक ऐतिहासिक खेळी केल्या आहेत. त्याला पद्म श्री पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पूर्व दिल्लीतून त्याने जवळपास 70000 मतांनी आघाडी घेतली आहे. त्याला 136914 मतं मिळाली आहेत. त्यापाठोपाठ काँग्रेसच्या अरविंद सिंग लवली यांनी 67761 मतं, तर आपच्या आतिशीने 46453 मतं घेतली आहेत.