मोदींच्या उज्ज्वला योजनेची संबित पात्रा यांच्याकडूनच पोलखोल ?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 12:39 PM2019-04-01T12:39:56+5:302019-04-01T12:44:10+5:30
संबित पात्रा यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते एका गरीब कुटुंबात जेवताना दिसत आहे. यावेळी जेवत असताना त्या कुटुंबातील महिला चुलीवर जेवन तयार करताना दिसत आहे.
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आणि नेते प्रचारासाठी सज्ज झाले आहे. आपला विजय निश्चित करण्यासाठी नेत्यांकडून दिवस-रात्र भेटीगाठींचा धडाका सुरू आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा देखील मतदारांच्या भेटी गाठी घेत असून त्यांच्या घरी जेवन करताना दिसत आहेत. याचा एक व्हिडिओ संबित पात्रा यांनी शेअर केला आहे. मात्र या व्हिडिओमुळेच ते ट्रोल होत असून त्यांनी स्वत:च भाजप सरकारची पोलखोल केल्याचे बोलले जात आहे.
भाजपकडून पुरी मतदार संघातून भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांना मैदानात उतरविण्यात आले आहे. आपला प्रचार करण्यासाठी गरीबांच्या घरी जेवन करत आहे. परंतु त्यांच्या व्हिडिओमुळे मोदी सरकारच्या उज्ज्वला योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच संबित पात्रा जेवन करत असलेल्या कुटुंबाला उज्ज्वला योजनेचा लाभ का नाही मिळाला असा असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
ଏହା ମୋର ନିଜ ଘର, ମାଁ ମୋତେ ନିଜ ହାତରନ୍ଧା ଖୁଆଇଲେ । ମୁଁ ମଧ୍ୟ ମୋ ନିଜ ହାତରେ ତାଙ୍କୁ ଖୁଆଇଲି ଏବଂ ମୁଁ ଜାଣେ ମାନବ ସେବା ହିଁ ଈଶ୍ୱରଙ୍କ ସବୁଠୁ ବଡ଼ ପୂଜା ଅଟେ l [2/2]@BJP4Odisha#PhirEkBaarModiSarkarpic.twitter.com/PiZLZKSZmL
— Chowkidar Sambit Patra (@sambitswaraj) March 31, 2019
संबित पात्रा यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते एका गरीब कुटुंबात जेवताना दिसत आहे. यावेळी जेवत असताना त्या कुटुंबातील महिला चुलीवर जेवन तयार करताना दिसत आहे. तसेच पात्रा महिलेला जेवन भरवताना दिसत आहे. तसेट ट्विटमध्ये लिहिले की, हे माझं कुटुंब आहे. आईने जेवन तयार केले आहे. मी देखील त्यांना जेवन भरवले.
हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर संबित पात्रा ट्रोल होत आहे. तसेच मोदी सरकारच्या उज्ज्वला योजनेअंतर्गत संबंधित महिलेला गॅस-सिलेंडर का नाही, मिळाले असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेची मोठ्या प्रमाणाच चर्चा झाली होती. ही योजना १ मे २०१६ रोजी लॉन्च करण्यात आली होती. देशातील महिलांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र संबित पात्रा जेवत असलेल्या कुटुंबियांकडेच गॅस नसल्याचे पाहून योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे.