नवी दिल्ली - देशातील चार टप्प्यातील मतदानानंतर भाजप मोठ्या विजयाकडे वाटचाल करत असल्याचा दावा भाजपचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष डॉ. महेंद्रनाथ पांड्येय यांनी केला आहे. त्यांच्यानुसार देशात २०१४ पेक्षा मोठी लाट आहे. यावेळी त्यांनी पक्षांतर करून भाजपमध्ये दाखल झालेल्या नेत्यांचे समर्थन केले आहे. तसेच त्या नेत्यांच्या संबंध कुठे ना कुठे भाजपशी होता, असा दावा देखील केला.
राज्यातील अनेक ठिकाणी विजयाचे समीकरण लक्षात घेऊन तिकीट वाटप कऱण्यात आले आहे. तसेच समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांच्या युतीमुळे भाजपवर फारसा परिणाम होणार नाही. सपा-बसपा युती केवळ चार-पाच जागांवर सिमीत राहिल असा अंदाज पांड्येय यांनी व्यक्त केला. तर काँग्रेस देखील काही विशेष करिष्मा करू शकणार नाही, असंही त्यांनी म्हटले आहे.
पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानापासूनच भाजपच्या बाजुने सर्व्हे येत आहेत. त्यामुळे २०१४ पेक्षा मोठी मोदीलाट यावर्षी असल्याचे पांड्येय यांनी सांगितले. तसेच सपा आणि बसपा ज्या जातींच्या जोरावर राजकारण करत आहेत, त्या जाती त्यांच्यासोबत नसून मोदींच्या पाठिशी आहे. त्यामुळे सपा-बसपा युती केवळ चार-पाच जागा मिळविण्यात यशस्वी होईल, असा दावा देखील पांड्ये यांनी केला आहे.
दरम्यान काँग्रेस ७५ जागा लढवत आहे. याचा भाजपवर काहीही परिणाम होणार नाही. काँग्रेस केवळ आपल्या अस्तित्वासाठी निवडणूक लढवत आहे. त्यामुळे राहुल गांधींवर दोन जागांवरून निवडणूक लढविण्याची वेळ आली आहे. भाजप अमेठी आणि रायबरेलीतून विजयी होण्याची शक्यता पांड्ये यांनी व्यक्त केली आहे.