नवी दिल्ली : दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या पत्रकार परिषेदेत कॉंग्रेस प्रवक्ते पवन खेड़ा यांनी भाजपवर निशाना साधला. भाजपकडे फक्त ८-९ दिवस शिल्लक राहिले असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा त्यांनी समाचार घेतला. याचवेळी भाजपच्या एका समर्थकाने पत्रकार परिषदेत गोंधळ घातला. त्यानंतर, कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी त्याला सुरक्षा रक्षकाच्या ताब्यात दिले.
दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या कॉंग्रेसची पत्रकार परिषेद चांगलीच चर्चेत आली आहे. पवन खेड़ा हे पत्रकारांशी बोलताना भाजपवर निशाना साधत होते. त्याचवेळी, या पत्रकार परिषेदत भाजप समर्थक नचिकेत वाल्हेकर हा हातात तिरंगा घेऊन पत्रकारांच्या समोर येऊन उभा राहिला. वाल्हेकर याने यावेळी ‘वंदे मातरम’ आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या. अचानक झालेल्या प्रकाराने पवन खेड़ा काही वेळ गोंधळात पडले होते.
यावेळी वाल्हेकर म्हणाला, ‘योगी आदित्यनाथ यांना अजय सिंह बिष्ट म्हणणं म्हणजे भारतीय संस्कृतीचा अपमान आहे.’ कॉंग्रसचे लोक फक्त मोदी-शहा यांच्या नावाने ओरडत असतात. ममता बनर्जी यांचे नाव घेण्याची यांच्यात हिम्मत नाही. प्रत्यक्षात मोदी-शहा हेच खरे काम करत असल्याचे वाल्हेकर म्हणाले.
रायबरेली येथे मंगळवारी कॉंग्रेस आमदार अदिति सिंह यांच्यावर झालेल्या ह्ल्ल्याला भाजप जबाबदार असल्याचे आरोप खेड़ा यांनी केला. लोकसभा निवडणुकीचे २३ रोजी निकाल लागणार आहे. त्यानंतर भाजप सत्तेत राहणार नाही, असेही खेड़ा म्हणाले.